बुलढाणा ( गजेंद्र गवई)
चिखली तालुक्यातील मौ पांढरदेव येथे क्रांतिकारी पंचशिल युवा मंडल पांढरदेव व समस्त गावकरी यांचे वतीने बुद्धमूर्ति स्थापना 11 व्या वर्धापन दिना निमित्ताने आयोजित विशाल धम्म मेळाव्यात से नि थानेदार अशोकराव काकड़े यांना नुकतेच स्वाभिमान समाज गौरव पुरस्कार 2023 मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.[ads id="ads1"]
सदर धम्म मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त बीडीओ शिवाजी दादा गवई होते तर प्रमुख उपस्थिति एस एस गवई, राजू गवई, प्रा निकालजे, पत्रकार संजय निकालजे,पत्रकार प्रशांत डोंगरदिवे, मा सरपंच संतोष खरात, लोकशाहीर शिवाजी लहाने,यांची होती.[ads id="ads2"]
अशोकराव काकड़े यांनी 38 वर्षे पोलिस प्रशासनात सेवा दिली. तब्बल 7 वर्षे विविध पोलिस स्टेशन येथे पी एस आय म्हणून कार्यरत होते.जानेफल पोलिस स्टेशन येथून सेवानिवृत्त होऊन त्यानी सामाजिक कार्यास वाहून घेतले, दरम्यान च्या कालात भारतिय बौद्ध महासभा या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्थापित धम्म मातृसंस्था चे दे राजा तालुका अध्यक्ष पदी निवड झाले नन्तर सम्पूर्ण दे राजा च्या गाव खेड़यात शेकडो शाखा स्थापन करून अनेक धम्म शिबिर, धम्म मेळावे,समता सैनिक दल चे प्रशिक्षण कार्यक्रम यशस्विपणे पूर्ण केले,गाँवोगावी अनेक प्रबोधन,प्रवचन कार्यक्रमा चे आयोजन करून समाज प्रबोधन केले,अनेक नवतरुन युवक, युवती यांना रोजगार, स्वयनरोजगार, शेती याबाबत मार्गदर्शन करून सहाय्य केले या सम्पूर्ण जीवन कार्याची दखल घेऊन त्यांना मा बीडीओ शिवाजी दादा गवई यांचे हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितित स्वाभिमान समाजगौरव पुरस्कार 2023 ..सन्मानपत्र, शाल,पुष्पहार देऊन सन्मानपूर्वक गौरविन्यात आले.सदर पुरस्कार मिळाल्या मुळे अशोकराव काकड़े यांचे समाजाच्या सर्व स्तरातून अभिनन्दन करण्यात येत आहे .
सदर धम्म मेळाव्यास जिल्हाभरातून हजारों च्या संख्येने उपासक उपासिका प्रचंड स्वरुपात उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन प्रवक्ते गजेंद्र गवई यांनी केले.आभार गजानन गवई यांनी मानले.