मलकापूर पासुन जवळच असलेल्या नवीन कृऊबासच्या समोर बेलाड ग्रामपंचायत हद्दीत वार्ड क्रमांक १ मध्ये नाथ जोगी समाजाचे लोक अनेक वर्षापासून वास्तव्यात आहे परंतु ग्रामपंचायत तर्फे अजूनही त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही तेथील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे याबाबत अनेकदा मागणी करून निवेदन देऊनही कुठलीही दखल न घेतल्याने वंचितच्या महिला नेत्या व ग्रा.पं.सदस्या दीपमाला इंगळे व तांडा वस्तीतिल भारती आबाराव सावंत, विमलबाई मंगल जगताप, ताई बाबुराव सावंत, गंगुबाई वामन शिंदे यानी उपोषण सुरू केले होते.[ads id="ads2"]
तब्बल चार दिवस उलटूनही प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करीत वंचितचे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे व तालुकाध्यक्ष सुशिल मोरे यांनी चक्काजाम करण्याचा इशारा दिला होता.
त्या अनुषंगाने 22 फेब्रुवारी रोजी नाथजोगींच्या तांडा वस्ती समोर पिण्याच्या पाण्याकरता स्टॅन्डपोस्ट उभारून प्रत्यक्ष कामाला सुरुवात आली असून वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश आले आहे त्यामुळे २३ फेब्रुवारी रोजी गटविकास अधिकारी होळकर साहेब तथा वंचित आघाडीचे अतिशभाई खराटे, सुशीलभाऊ मोरे, यशवंत कळासे,भाऊराव उमाळे, विलास तायडे,गजानन झणके,शेख यासीन कुरेशी,गणेश सावळे,राजू शेगोकार,आबाराव सावंत,देवानंद इंगळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यांचे उपस्थितीत त्या महिलांनी उपोषण मागे घेतले आहे.