राज्यस्तरिय प्राध्यापक - विद्यार्थी विनिमय कार्यक्रम व शैक्षणीक संसाधन निर्माण समिती समन्वयकपदी अमळनेर येथील प्राध्यापकांची निवड


 अमळनेर (अमोल बैसाने) महाराष्ट्र राज्यात व्यवसायिक समाजकार्याचे शिक्षण देणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थां महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाशी संलग्नित कार्यरत आहेत. या संस्थांमार्फत समाज कल्याण व सामाजिक विकासाची उपक्रम राबवणारे प्रशिक्षित समाज कार्यकर्ते तयार केले जातात. हे महाविद्यालये संख्येने कमी असली तरी त्यांचे उपक्रम भरीव व समाज उपयोगी असतात. [ads id="ads1"]  

अशाच समाजकार्याचे शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या महाराष्ट्रभरातील संस्थांमधील लोकांसाठी काम करणारी मास्वे ही अग्रगण्य राज्यस्तरीय संघटना आहे. समाजकार्याचे शिक्षण अधिक रोजगारक्षम, समाज उपयोगी व राष्ट्रनिर्माण मध्ये उपयोगी होईल यासाठी ही संस्था काम करते. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अंबादास मोहिते तथा मास्वे कार्यकारी समितीने  अमळनेर समाजकार्य महाविद्यालयातील दोन प्राध्यापक  डॉ. भरत खंडागळे व प्रा. विजयकुमार वाघमारे यांचे नुकतीच राज्यस्तरिय प्राध्यापक - विद्यार्थी विनिमय कार्यक्रम व शैक्षणीक संसाधन निर्माण समिती समन्वयकपदी निवड केली आहे. [ads id="ads2"]  

या समितीमध्ये महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील ज्येष्ठ व प्रयोगशील प्राध्यापकांची निवड केली असून समित्यांमार्फत राज्यभरातील समाजकार्य शिक्षण देणाऱ्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणे, त्यांची गुणवत्ता, रोजगार क्षमता व कौशल्य वाढवणे यासाठी कार्य करणार आहे. 

तसेच जागतिक स्तरावरील व्यावसायिक समाजकार्यातील संदर्भ साहित्याचे आकलन करून त्याचे रूपांतर मराठी व स्थानिक भाषांमध्ये करण्यासाठी ही समिती कार्य करेल. 

मास्वे मार्फत या अगोदरही विविध सामाजिक व विद्यार्थी केंद्रित प्रश्न लोकशाही व सनदशीर मार्गाने सोडविण्यासाठी भरीव काम केले आहे. यापुढेही या उपक्रमाची व्यापकता वाढविण्यासाठी मासवेच्या कार्यकारी समितीने विवीध विषयावर काम करणाऱ्या समित्यांचे गठन करून विद्यार्थी, प्राध्यापक व समाज उपयोगी उपक्रम अधिक नियोजन व गुणवत्तापूर्ण राबवणीसाठी पुढाकार घेतला आहे.

मासवेच्या विविध समित्यांवर नियुक्ती झालेल्या सर्व सन्माननीय सदस्यांचे प्राध्यापक, विद्यार्थी व समाजकार्य महाविद्यालयाकडून अभिनंदन व स्वागत करण्यात आले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️