आज दिनांक 8 फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक बातम्या

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

📣 भाविकांना आता वनी गडावर 13 फेब्रुवारीपासून 100 रुपये देऊन सशुल्क व्हीआयपी दर्शन घेता येणार, तसेच पूर्वीची सामान्य व्यवस्थाही भाविकांसाठी उपलब्ध असणार आहे. 


📣 भारतातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसने अंतर्गत मुल्यमापन परीक्षेत नापास झालेल्या तब्बल ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. 


📣 बदलत्या वातावरणामुळे आणि सीएमी व्हायर्सच्या प्रादूभावमुळे जळगाव जिल्ह्यात केळीचा भाव ७० रुपये प्रति डझन झाला आहे.  

 [ads id="ads1"]  

📣 जे सरकार कलम 370 हटवू शकतं ते सरकार शिवनेरीवर कायमचा भगवा लावण्यास परवानगी देईल का ? - असा गंभीर सवाल अमोल कोल्हेंनी सरकारवर केला आहे. 


📣 समृद्धी महामार्गानंतर आता राज्यात आणखी एक परिवहन क्रांती होणार, नागपूर-गोवा प्रवास केवळ 11 तासांत शक्य होणार आहे - अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.  


📣 मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी ही घोषणा केली आहे. त्यानुसार आता ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे, बसनंतर विमाानातून मोफत प्रवास करता येणार आहे. 


▪️ अदानी - PM मोदींचा संबंध काय?: राहुल गांधी म्हणाले - अदानी 2014च्या श्रीमंतांच्या यादीत 609 नंबरवर होते, जादू झाली 2 नंबरवर आले

 [ads id="ads2"]  

▪️ भाजप नेता हायकोर्टात न्यायाधीश कसा?: SCने याचिका फेटाळली, सुनावणी सुरू असताना गौरींनी मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधीशपदाची शपथ घेतली


▪️ केरळमध्ये पहिल्यांदाच ट्रान्सवुमनला 7 वर्षांची शिक्षा: 16 वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप, 25 हजारांचा दंडही


▪️ चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे उमेदवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा


▪️ थोरातांच्या राजीनाम्यावर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया: म्हणाले - ते आमचे ज्येष्ठ नेते, वाढदिवसाच्या दिवशीच जे झाले ते दुर्दैवी!


▪️ चिंचवडमध्ये 'राष्ट्रवादी'त बंडखोरी: अजित पवार म्हणाले - मध्यस्थी करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही


▪️ चंद्रशेखर बावनकुळे यांची खुली ऑफर: बाळासाहेब थोरात भाजपमध्ये आल्यास त्यांचा मान राखू, त्यांना काँग्रेसपेक्षा मोठे स्थान देऊ


▪️ महाराष्ट्राचे नवे राज्यपाल नारायण राणे झाले तर...: संजय राऊत म्हणाले- मजा येईल, आम्ही या नावाचे स्वागत करू


▪️ PM मोदींना गिफ्टमध्ये मिळाली मेस्सीची जर्सी: बंगळुरूत अर्जेंटिनाची पेट्रोलियम कंपनी YPFच्या अध्यक्षांनी दिली भेट


▪️ राहुल द्रविडने बदलली नागपूरची खेळपट्टी: गवत पाहून नाराज झाले होते टीम इंडियाचेकोच, साईड स्क्रिनच्या स्थितीत बदल


▪️ भारत vs ऑस्ट्रेलिया: फिरकीच ठरवणार मालिकेची दिशा, बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी कसाेटी मालिका गुरुवारपासून रंगणार


▪️ ऋषभ शेट्टीने केली 'कांतारा 2'ची घोषणा: सिक्वेल नव्हे प्रीक्वेल होणार रिलीज, स्क्रिप्टवर काम सुरू


▪️लग्नगाठीत अडकले सिद्धार्थ-कियारा: पंजाबी ढोल आणि गाण्यांवर थिरकले वऱ्हाडी, दिल्लीहून आले स्पेशल बँड

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️