आज दिनांक 18 फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक बातम्या

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

📣 निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना मोठा दणका दिला आहे, आयोगाने 'शिवसेना' नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. 


📣 प्रलंबित अनुदानासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी 22 फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन होणार आहे.   


📣 आर्थिक मंदीचा फटका अनेक मोठ्या कंपन्यांना देखील बसत आहे, अशातच आता Google ने आपले तब्बल ४५३ कर्मचारी कमी केले आहेत.

 [ads id="ads1"]  

📣 नाशिक निओ मेट्रोला लवकरच हिरवा कंदील - नाशिक महापालिका आणि राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबतच सादरीकरण केले आहे.

 

📣 स्टिंग ऑपरेशनमध्ये वादग्रस्त विधान केल्यानंतर आता बीसीसीआयच्या निवड समितीचे चेअरमन चेतन शर्मां यांनी राजीनामा दिला आहे.  


📣 भारतीय वंशाचे अमेरिकन नील मोहन यांची यूट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे Chief Executive officer म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


📣 गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवा चार फेब्रुवारीपासून सुरु झाल्यानंतर आता मुंबई ते मीरा-भाईंदर वॉटर टॅक्सी सेवा येत्या आठ महिन्यांमध्ये सुरू होणार आहे.

 [ads id="ads2"]  

▪️ उद्धव ठाकरेंना धक्का: एकनाथ शिंदे यांना शिवसेनेसह धनुष्यबाण चिन्ह; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय


▪️ काॅंग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण धनुष्यबाण आम्ही सोडवला: बाळासाहेबांचे विचार विकण्याचे पाप करणाऱ्याना चपराक - CM शिंदेंची ठाकरेंवर टीका


▪️ 100 कौरव एकत्र आले तरी पांडव जिंकेल: चोरांना राजमान्यता देणे भूषणावह नाही, महाराष्ट्रातील जनता याचा बदला घेणारच - उद्धव ठाकरे


▪️ कुबेरेश्वर धाममध्ये महाराष्ट्राच्या 2 महिला, मुलाचा मृत्यू: जळगावचा होता मुलगा; पंडित प्रदीप मिश्रा म्हणाले - आता वर्षभर मिळणार रुद्राक्ष


▪️ संजय शिरसाट यांचा मोठा गौप्यस्फोट: राऊतांना रश्मी वहिनींनी प्रसाद दिला होता, मातोश्रीचे ऑपरेटर, किचनमधील लोकांना माहितेय


▪️ काश्मीरमध्ये भारत-पाकिस्तानच्या सीमेवर उभारणार शिवरायांचा पुतळा: भूमिपूजनासाठी LOC वर नेली जाणार किल्ल्यांवरील माती आणि पाणी


▪️ हिंडेनबर्ग प्रकरणी केंद्राला झटका: सुप्रीम कोर्टाने समिती सदस्यांची नावे बंद लिफाफ्यात देण्याचा प्रस्ताव फेटाळला; म्हणाले - पारदर्शकता हवी


▪️ ट्विटरने भारतातील 3 पैकी 2 कार्यालये बंद केली: आता काम फक्त बेंगळुरूमध्येच होणार, दिल्ली-मुंबई कर्मचाऱ्यांना घरी पाठवले


▪️ IPL 2023 चे वेळापत्रक जाहीर: गुजरात आणि चेन्नई यांच्यातील पहिला सामना 31 मार्च रोजी; तर 28 मे रोजी फायनल


▪️ भारत-ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी: कांगारूंचा पहिला डाव 263 धावांवर आटोपला, शमीने घेतल्या सर्वाधिक 4 विकेट, भारत 21/0 


▪️ स्टिंग ऑपरेशननंतर मुख्य निवडकर्ता चेतन शर्माचा राजीनामा: म्हणाले- भारतीय क्रिकेटपटू तंदुरुस्त राहण्यासाठी इंजेक्शन घेतात


▪️ साखरपुड्यानंतर स्वरा भास्करने केला जबरदस्त डान्स: पती फहाद अहमदने फोटो शेअर करत लिहिले- मी तिला थांबवू शकलो नाही


➣महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण सध्याच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढेच राहणार, सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीला..


➣पहाटेच्या शपथ विधीची माहिती शरद पवारांप्रमाणे संजय राऊतांना देखील होती; शिंदे गटाचा मोठा गौप्यस्फोट..  


➣ऑक्सिजन लावून गिरीश बापटांना प्रचारात उतरवणं योग्य आहे का? अजित पवारांचा सवाल.. 


➣सहलीसाठी शिर्डीला आलेल्या अमरावतीच्या विद्यार्थ्यांना विषबाधा, 82 विद्यार्थी शिर्डी संस्थानच्या रूग्णालयात दाखल..  


➣शिवजयंतीला शिवनेरीवर जाणाऱ्या शिवभक्तांना राज्य सरकारकडून दिलासा, शिवनेरी मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी..  


➣एअर इंडिया अमेरिकेकडून 840 विमानं खरेदी करणार, विमान कंपन्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा करार..  

 

➣मध्य प्रदेशातील कुबेश्वर धामातील रुद्राक्ष महोत्सवात रुद्राक्ष मिळवण्यासाठी भाविकांची झुंबड.. 


➣नाशिकसह जिल्ह्यात दिवसा उन्हाळा अन् रात्री हिवाळ्याचा अनुभव; डॉक्टरांकडून महत्वाचं आवाहन..


➣बॉर्डर-गावस्कर मालिकेतील भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस संपला, 263 धावांवर ऑस्ट्रेलिया सर्वबाद, दिवसअखेर भारत 21/0..  

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️