🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
1️⃣ राज्यात शिक्षकांची सुमारे 30 हजार पदे लवकर भरली जाणार, वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या 17व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनात मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
2️⃣ शिवनेरी येथे 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान हिंदवी स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात येणार, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा होणार
3️⃣ देशाची पहिली इलेक्ट्रीक एअर टॅक्सी 2024-25 च्या सुरूवातीला होणार लॉंच, बंगळुरूच्या एअरो इंडिया शोमध्ये इलेक्ट्रीक एअर टॅक्सीची दिसली झलक
[ads id="ads1"]
4️⃣ बीबीसीवरील आयकरची कारवाई संपली, आयकर विभागाने बीबीसी कार्यालयावर छापे टाकून झाडाझडतीची कारवाई 55 तासांनंतर संपली
5️⃣ केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यमान प्रतवारी कामगिरी निर्देशांकात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक; महाराष्ट्राला मिळाले 928/1000 गुण
6️⃣ बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचे झाले लग्न, राजकीय कार्यकर्ते फहाद अहमदसोबत बांधली लग्नगाठ; व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
7️⃣ दिल्लीत H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरसची एन्ट्री, अमेरिका, चीनमध्ये धुमाकुळ घालणाऱ्या व्हायरसने वाढवली डोकेदुखी
8️⃣ राज्यातील सहकारी संस्थांच्या पुढील टप्प्याच्या निवडणुका होणार; 1 मार्चपासून निवडणूक प्रक्रिया होणार सुरू
9️⃣ शेअर बाजार: आज सेन्सेक्समध्ये 44 अंकांची झेप घेत 61,319.51 वर बंद, तर निफ्टीत 20 अंकांची वाढ होऊन 18,035.85 वर बंद
🔟 आजचे सोन्याचे दर: मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचे दर 52,000 रुपये तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 56,730 रुपये
[ads id="ads2"]
📣 स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना दणका, 1 वर्षाच्या कर्जासाठी बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ लँडिंग रेट MCLR 10 बेसिस पॉइंट वाढवून 8.60% केला.
📣 आरबीआय ने डिजिटल कर्ज देणाऱ्या कंपन्यांबाबत घेतला मोठा निर्णय - कर्जवसुली करण्यासाठी जे वसुली एजंट नेमले जातील, त्यांची संपूर्ण माहिती कर्जदाराला देण्यात येणार.
📣 यंदा राज्यात निर्बंधमुक्त महाशिवरात्री साजरी करण्यात येणार आहे, त्यामुळे महाशिवरात्रीसाठी मुंबईतील महत्वाच्या मंदिरांमध्ये भक्तांना दर्शनासाठी जाता यावे म्हणून बेस्ट प्रशासनाने विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
📣 उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे, तर औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला दिली आहे.
📣 HAL च्या HALFT-42 विमानावर असलेल्या हनुमानाचा फोटो खूप वायरल झाला पण सोबतच त्याला धार्मिक उदात्तीकरणाचे वळण सुद्धा लागले. हा वाद अधिक वाढू नये यासाठी HAL ने हा फोटो हटवण्याचा निर्णय घेतला.
📣 चित्रपटसृष्टीत काम करणारे कलाकार आणि कामगारांसहित निर्माते व दिग्दर्शक यांसाठी एक नवीन नियमावली सरकारने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, लवकरच नवीन नियमावली सरकारकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
📣 राजगडावर कचरा आणि घाण होत असल्याचे कारण देत पुरातत्व विभागाने राजगड किल्यावर रात्रीच्या वेळी मुक्काम करण्यास बंदी घातली आहे.
▪️ महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष: शिवसेनेच्या ठाकरे - शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण, सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला; निकालाची उत्कंठा शिगेला
▪️ शिंदे गट बुद्धिबळाच्या खेळासारखा खेळला: सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण विधान; सिब्बल म्हणाले- पाया पडतो, 10व्या सूचीचा गैरवापर होऊ देऊ नका
▪️ भाविकांसाठी आनंदाची बातमी: शिर्डीत नाईट लँडिंगचा परवाना प्राप्त!, समृद्धी, वंदे भारतनंतर केंद्राचे महाराष्ट्राला तिसरे गिफ्ट
▪️ उस्मानाबादचे ‘धाराशिव’ करण्यास केंद्राची मंजुरी: मुंबई हायकोर्टात माहिती; औरंगाबादचे 'संभाजीनगर’ करण्याचा प्रस्ताव विचाराधीनv
▪️ स्लो ट्रॅफीकमध्ये पुणे जगात सहाव्या क्रमांकावर: रहदारीतून 10 किमी अंतर कापण्यासाठी लागतात तब्बल 27 मिनिटे 20 सेकंद!
▪️ जितेंद्र आव्हाडांसह 7 जणांवर गुन्हा दाखल: ठाणे मनपाच्या सहाय्यक आयुक्तांवर प्राणघातक हल्ला; आव्हाडांच्या मुलीचीही तक्रार
▪️ मनपा सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या केबिनमध्ये पैशांची थप्पी: जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला व्हिडिओ; प्रकरण चिघळण्याची शक्यता
▪️ फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांचे वक्तव्य: ''पुन्हा पुन्हा तेच उगाळून काढू नका, मी याआधीही शपथविधीवर बोललो होतो, विषय संपला!
▪️ पृथ्वी शॉसोबत सेल्फीवरून वाद: शॉच्या गाडीची तोडफोड; दुसरा पक्ष म्हणतो-माझा मोबाईल हिसकावून फेकून दिला, मारहाण केली
▪️ स्वरा भास्कर अडकली लग्नाच्या बेडीत: सपा नेता फहाद अहमदशी केले लग्न, आंदोलनात झाली होती दोघांची पहिली भेट
▪️ बुर्ज खलिफावर झळकला 'शेहजादा'चा ट्रेलर: दिल्लीच्या इंडिया गेटपासून ते दुबईपर्यंत, चित्रपटाचे प्रमोशन करतोय कार्तिक आर्यन