आज दिनांक 16 फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक बातम्या

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

1️⃣  राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाला 500 कोटींचे भागभांडवल देण्यात आले, कर्जवाटप पुन्हा सुरू होऊन दिव्यांग बांधवांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता येणार


2️⃣ छत्तीसगडच्या सुकमा येथे 33 नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ आणि राज्य पोलिसांच्या समोर केले आत्मसमर्पण, त्यांच्यावर 3 ते 10 लाख रुपये होते बक्षीस


3️⃣ शिक्षणासाठी विद्यापीठात येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची राहण्याची सोय व्हावी म्हणून विशेष वसतिगृह उभारण्याच्या कामाला गती द्यावी; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे निर्देश


4️⃣ पेटीएम युजर्ससाठी गुडन्यूज, कंपनीने UPI Lite ही फास्ट सर्व्हिस केली लॉंच; वापरकर्ते पिन शिवाय लहान लहान किंमतीचे UPI व्यवहार करू शकणार

   [ads id="ads1"]  

5️⃣ शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी, आग्रा किल्ल्यात पहिल्यांदाच साजरी होणार शिवजयंती; केंद्रीय पुरातत्व विभागाने दिली परवानगी

 

6️⃣ जिओ मार्टची 'एक्सप्रेस' सेवा बंद, ग्राहकांना कोणतीच पूर्वकल्पना न देताच जिओ मार्टने आपली वितरण सेवा 'एक्सप्रेस' केली बंद 


7️⃣  उत्तर प्रदेशातील नोएडा येथे सैनिक भरतीत नापास झाल्याने आत्महत्या, एका 19 वर्षीय युवकाने अग्निवीर सैन्य भरतीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे घेतला गळफास 


8️⃣  केपटाऊनमध्ये भारताने नाणेफेक गमावली, महिला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिला संघाचा सामना आज वेस्ट-इंडिजच्या महिला संघासोबत होणार 


9️⃣ शेअर बाजार: आज सेन्सेक्समध्ये 242 अंकांची झेप घेत 61,275.09 वर बंद, तर निफ्टीत 86 अंकांची वाढ होऊन 18,015.85 वर बंद


🔟 आजचे सोन्याचे दर: मुंबईत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 57160 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 52400 रुपये


📣 दहावी बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून परीक्षा केंद्रावर इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


📣 शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, आग्रा किल्ल्यात पहिल्यांदाच शिवजयंती साजरी करण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाने परवानगी दिली. 


📣 एअर इंडियाकडून विमान खरेदीचा व्यवहार मंजूर - फ्रान्सच्या एअरबसकडून 250 आणि अमेरिकेच्या बोईंगकडून 220 अशी तब्बल 470 विमाने खरेदी करणार. 

 [ads id="ads2"]  

📣 आरबीआयचा ग्राहकांना मोठा दिलासा - कर्जाचा हप्ता थकला तर पेनल्टी बंद होणार, यासाठी आरबीआय लवकरच ड्रॉप जारी करणार आहे. 

 

📣 पर्यटकांसाठी आनंदाची बातमी - मुगल बादशाह शाहजहा यांच्या 368 व्या पुण्यतिथी निमित्य ताजमहल मध्ये १७ ते १९ फेब्रुवारी पर्यंत प्रवेश फ्री असणार. 


📣 इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू तसेच २०१९ ला वन डे विश्वचषक जिंकूण देणाऱ्या इऑन मॉर्गन याने सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 


▪️ इयत्ता 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय


▪️ सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी: महेश जेठमलानी, मनिंदर सिंग मांडतील बाजू, आज विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवरच युक्तिवाद


▪️ महाविकास आघाडी सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात मोठा दावा


▪️ मोठी बातमी: जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याबाबत ऑडिओ क्लिप व्हायरल, समर्थकांकडून महेश आहेर यांना मारहाण


▪️ स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांसह सहकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर, 25 आंदोलकांना जणांना केली होती अटक


▪️ मी नाराज नव्हतोच: बाळासाहेब थोरात; म्हणाले - पवारांना विचारून शपथविधी झाला असता, तर सरकार पडले नसते


▪️ कसब्यात 'मविआ'त बिनसले: काँग्रेस उमेदवारांच्या बॅनरवर 'राष्ट्रवादी'च्या नेत्यांचे फोटो गायब; नाना चर्चांना उधाण


▪️ एक विचारधारा देशाला बिघडवू शकत नाही: मोहन भागवत यांचे विधान, म्हणाले- चांगल्या देशात सर्व प्रकारचे विचार असतात


▪️ दीप्ती शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा! टी२० मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारी बनली पहिली गोलंदाज


▪️ सानिया मिर्झाची IPL मध्ये एंट्री, सानियावर RCB ने सोपवली मोठी जबाबदारी; स्मृती मानधना अँड टीमला मार्गदर्शन करणार


▪️ दीया मिर्झाने लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेअर केला स्पेशल व्हिडिओ: मराठीत घेतली होती शपथ, नवऱ्यासाठी लिहिला प्रेमळ संदेश


▪️ बिग बॉस 16चा विजेता MC स्टॅनचा नवा विक्रम: लोकप्रियतेत विराट कोहलीला मागे टाकले, सिद्धार्थ शुक्लाचाही विक्रम मोडला


जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️