आज दिनांक 15 फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक बातम्या

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

📣 10 वी-12 वीच्या परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार असून, संवेदनशील परीक्षा केंद्रांवर शक्यतेनुसार चित्रीकरण करण्यात येणार, त्यामुळे केंद्राजवळील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात येणार.

 हेही वाचा:- भरधाव ट्रकच्या चाकाखाली सापडून‎ चार वर्षीय  बालिका ठार : मुक्ताईनगर तालुक्यातील घटना


📣 BBC च्या दिल्ली, मुंबई कार्यालयावर आयकर विभागाचे छापे, कर्मचाऱ्यांचे फोन देखील जप्त करण्यात आले असून, आमचे चौकशीला पूर्ण सहकार्य, लवकरच सर्व काही सुरळित होणार असे बीबीसीचे म्हणणे आहे. 


📣 गेल्या ५ दिवसापासून बंगळुरूत एरो इंडिया शो सुरू असून, या एयरो इंडिया २०२३ मध्ये भारताने ५० KMPH वेगाने हवेत उडणारे जॅटपॅक सूट बनवला आहे. 

  [ads id="ads1"]  

📣 शिंदे-फडणवीस सरकराने राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची बदली मुंबईत झाली तर त्यांच्या जागी सिद्धराम सलीमठ नवे जिल्हाधिकारी म्हणून आले आहेत.


📣 मुंबईची हवा बनली घातक - जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये मुंबई दुसऱ्या स्थानावर.


📣 अमेरिकन क्लाउड कम्यूनिकेशन्स कंपनी ट्विलियोने आपल्या 1500 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. कंपनीचे सीईओ जेफ लॉसन यांनी ही माहिती दिली आहे.


📣 राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालय आणि पदवी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले असून त्यांनी परीक्षांच्या कामावर बहिष्कार टाकला आहे.

 [ads id="ads2"]  

📣 केंद्र सरकारची पीएमश्री योजना ही आता महाराष्ट्रात देखील लागू होणार आहे, या योजनेअंतर्गत शाळेतील नवीन तंत्रज्ञान, स्मार्टक्लास, खेळ, ग्रंथालय अशा आधिनिक सोयी सुविधा अद्यावत केल्या जाणार आहेत.


▪️ अयोध्येत उभारणार RSSचे नवे मुख्यालय: संघाने टाऊनशिपमध्ये 100 एकर जागा मागितली, नागपूरपेक्षा 100 पट असेल मोठी


▪️ PM मोदींनी माझा अपमान केला: राहुल गांधींचा जोरदार पलटवार; म्हणाले - भारतात वडिलांचे आडनाव लावतात हे मोदींना ठावूक नाही


▪️ ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 च्या तिमाहीत अदानी एंटरप्रायझेसची जबरदस्त कामगिरी, तिमाहीत कंपनीने 820 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला 


▪️ सौदी अरेबियाची महिला अंतराळवीर स्पेस स्टेशनमध्ये जाणार: रेयाना बरनावी यांचे प्रशिक्षण सुरू, यंदा अमेरिकेतून उड्डाण होणार


▪️ सत्तासंघर्षावर आज सुनावणी: नबाम रेबिया प्रकरण, अपात्र आमदारांचा मुद्दा, अध्यक्षांचे अधिकार यावर वादाच्या फैरी झडल्या


▪️ छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 397 कोटी मंजूर, शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय


▪️ उच्च न्यायालयाचे निर्देश: नवाब मलिक खरेच आजारी आहेत, हे पटवून द्या; त्यानंतरच जामिनावर तातडीने सुनावणी घेऊ


▪️ मंत्रिमंडळ बैठकीत कोश्यारींचे अभिनंदन: धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 15 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार


▪️ उद्धव ठाकरेंचे सवाल: BBCवरील धाड कोणत्या लोकशाहीत बसते?, मोहन भागवत मशिदीत गेले तेव्हा हिंदुत्व सोडून आले का?


▪️ अनिल देशमुखांचे बावनकुळेंना आवाहन: मी भाजपमध्ये येण्याविषयी विचारलेच नाही, काही घडले असेल तर खुलेआम सांगावे


▪️ श्रेयस अय्यर दुसरी कसोटी खेळण्याची शक्यता कमी: बुमराहची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत परतण्याची घाई नाही


▪️ पठाण करतोय पूजाची प्रतिक्षा: निर्मात्यांनी खास अंदाजात जाहीर केली 'ड्रीम गर्ल 2'ची रिलीज डेट, तरुणीच्या भूमिकेत आयुष्मान खुराणा


▪️ सलमानचे 'नय्यो लगदा' गाणे चाहत्यांना पडले नापसंत: व्हिडिओ समोर येताच मीम्सचा पूर, कोरिओग्राफीची उडवली जातेय खिल्ली

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️