भरधाव कारची बैलगाडीला धडक बैलगाडी चालक जागीच ठार ; रावेर तालुक्यातील वडगाव गावा जवळची दुर्घटना

भरधाव कारची बैलगाडीला धडक बैलगाडी चालक जागीच ठार ; रावेर तालुक्यातील वडगाव गावा जवळची दुर्घटना

विवरे ता.रावेर (समाधान गाढे) रावेर तालुक्यातील वडगाव (Wadgaon Taluka Raver) येथील शेतकरी प्रवीण काशिनाथ पाटील वय ४० वर्ष, हे आज दिनांक(20 जानेवारी 2022)रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास बऱ्हाणपूर -अंकलेश्वर महामार्गावरून बैलगाडीने शेतात जात असतांना रावेर कडून भरधाव वेगाने येणाऱ्या MP04 CP 6380 या क्रमांकाच्या होंडा (ह्युंदाई) एक्सेंट कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीने बैलगाडी ला मागून जोरदार धडक दिल्याने शेतकरी प्रवीण काशिनाथ पाटील हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला (मेंदूला) जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. [ads id="ads1"]  

      सदर बैलगाडी कारच्या धडकेने दामू पाटील यांच्या शेतात फेकली गेल्याने एका बैलाचे शिंग देखील तुटले आहे. सदरची कार ही मध्यप्रदेश ची असून पेशन्ट ला घेऊन जळगाव येथे जात होती. अपघात घडले बाबत वडगाव येथील पोलिस पाटील संजय वाघोदे यांनी निंभोरा पोलिसांना (Nimbhora Police Station) भ्रमणध्वनी द्वारे माहिती दिली. [ads id="ads2"]  

 घटना स्थळी निंभोरा पोलीस स्टेशनचे (Nimbhora Police Station) ए. पि.आय. गणेश धुमाळ  ताफ्यासह दाखल झाले असता सदरील घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करणेसाठी पाठविण्यात आला आहे.

हेही वाचा :-ग्राम विकास अधिकारी अतुल पाटील याची बनवा बनवी : तक्रारदार करणार सहा फेब्रुवारी पासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण 

 या बाबत निंभोरा पोलीस स्टेशनला वडगाव येथील मयताचे नातेवाईक धनराज पाटील यांनी फिर्याद दिल्याप्रमाणे कारचालका विरोधात भादंवि कलम ३०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला .सदर घटनेचा पुढील तपास एपीआय गणेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय काशिनाथ कोळंबे हे करीत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️