पुरस्काराने प्रेरणा व ऊर्जा मिळते - पी.डी.पाटील
धरणगाव प्रतिनिधी - पी.डी. पाटील
धरणगांव - २५ जानेवारी - राष्ट्रीय मतदार दिवस तहसिल कार्यालय धरणगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. [ads id="ads1"]
सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे आदर्श शिक्षक पी डी पाटील यांनी मतदार नाव नोंदणी, नाव वगळणे, दिव्यांग मतदार नोंदणी, मतदान कार्डला आधार कार्ड लिंक करणे, मतदार यादी प्रसिद्ध करणे, असे विविध कार्य उत्कृष्टरित्या पार पाडल्याबद्दल या सन- २०२२ - २०२३ वर्षाचा ( स्वातंत्र्याचे अमृत वर्ष ) उत्कृष्ट बी एल ओ पुरस्कार मा. तहसिलदारसो. नितीनकुमार देवरे व मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आला. [ads id="ads2"]
याप्रसंगी तहसील कार्यालयाचे प्रमुख तहसिलदार नितीन कुमार देवरे, पोलीस निरीक्षक राहुल खताळ, गटविकास अधिकारी सुशांत पाटील , चव्हाण साहेब, पिंगळे साहेब, पाटील साहेब, लोकमतचे पत्रकार भगीरथ माळी, निवासी तहसिलदार लक्ष्मण सातपुते साहेब, महेंद्र पवार, पत्रकार विजय पाटील, कमलाकर पाटील, पी डी पाटील, अविनाश बाविस्कर तसेच धरणगाव शहरातील सर्व सन्माननीय पत्रकार बांधव, तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंद व सर्व शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्काराने ऊर्जा व प्रेरणा मिळते असे प्रतिपादन उत्कृष्ट बी.एल.ओ. पुरस्कारप्राप्त पी डी पाटील यांनी केले. व सर्वांना राष्ट्रीय मतदार दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.