एक तास बुद्ध विहारासाठी या अभियानांतर्गत सुगंध कुटी बौद्ध विहार येथे धम्मदेशना कार्यक्रम संपन्न

 


परळी प्रतिनिधी (बालासाहेब जगतकर) एक तास बौद्ध विहारासाठी या अभियानांतर्गत परळी शहरातील भीम नगर जगतकर गल्ली येथील सुगंध कुटी बौद्ध विहार येथे धम्मदेशना कार्यक्रम संपन्न झाला असल्याची माहिती बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे. [ads id="ads1"]  

 याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 26 1 2023 गुरुवार रोजी परळी शहरातील भीम नगर जगतकर गल्ली येथील सुगंध कुटी बुद्ध विहार येथे एक तास बौद्ध विहारासाठी या अभियानांतर्गत शिरसाळा येथील भंते पंयातिस थेरो यांची धम्मदेशना संपन्न झाली असून आर एच टी सी न्यूज चे संपादक वैजनाथ गायकवाड यांचे बुद्ध धर्म या विषयावर मार्गदर्शन लाभले. [ads id="ads2"]  

यावेळी भीम नगर येथील ज्येष्ठ उपासक नितीन सुधाकर जगतकर यांच्या परिवाराच्या वतीने बुद्ध पूजा करण्यात आली असून त्यांचाही यावेळी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या धम्मयान ही दिनदर्शि का व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला असून या कार्यक्रमास प्राध्यापक विलास रोडे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सचिव एच.टी. वाघमारे सर सिद्धार्थ जगतकर मुकुंद अण्णा जगतकर श्रावण भाऊ जगतकर अशोक जगतकर वसंत बनसोडे राज जगतकर यांच्यासह भिम नगर येथील बुद्ध वंदना संघाच्या महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकेत बनसोडे रोहित जगतकर दिनेश जगतकर निलेश जगतकर यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले असून या पुढील काळात एक तास बुद्ध विहारासाठी या अभियानांतर्गत दर गुरुवारी ज्यांच्या हस्ते पूजा आहे त्यांना बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया धम्मयान 2023 ची दिनदर्शिका ही सप्रेम भेट देण्यात येणार असून.लहान मुलांसाठी बाल संस्कार शिबिर दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर व अनेक विचारवंताच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ही बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️