बऱ्हाणपूर अंकलेशवर महामार्गावरील हिंगोणा गावाजवळ अपघात दोन जण गंभीर जखमी

 

यावल (फिरोज तडवी): यावल-फैजपूर रस्त्यावर हिंगोण्याजवळ दुचाकी व कारमध्ये अपघात होवून दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी दुपारी घडला. जखमींना घटनास्थळावरून खाजगी रुग्णालयात उपचाराकरीता हलवण्यात आले आहे. अपघात कसा घडला हे मात्र कळू शकले नाही. [ads id="ads1"]  

: अपघातानंतर पोलिसांनी घेतली धाव यावल-फैजपूर रस्त्यावर हिंगोणा गावाजवळ चारचाकी (वाहन क्रमांक एम.एच. 19 सी.झेड. 7806) व्दारे लक्ष्मण नारायण सपकाळे फैजपूरकडून यावलकडे येत असताना दुचाकीने यावलकडून फैजपूरकडे कलीम सलीम तडवी (20) व नदीम खान सलीम खान (18, दोघे रा.साकळी) हे निघाले असताना अपघात घडला.  [ads id="ads2"]  

  या अपघातात अशपाक बिसमील्लाह तडवी (साकळी) व चारचाकी वाहन चालक लक्ष्मण नारायण सपकाळे (59) हे किरकोळ जखमी झाले. जखमींवर फैजपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातस्थळी फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर, राजेश बर्‍हाटे यांनी धाव घेतली.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️