हॉटेल व्यावसायिक आणि होम स्टे मालकाना कमार्शीअल वीज दराच्या ओझ्यातून मुक्तता मिळण्याची आशा ! मिहीर महाजन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी


दापोली तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. पुर्ण तालुक्यात हॉटेल व्यावसायिक आणि होम स्टे चालक यांची संख्या लक्षणीय आहे.सरकारच्या पर्यटन विभागा मार्फत या उद्योगाला चालना देण्यासाठी अशा हॉटेल आणि होम स्टे ला industry चा दर्जा देण्यात आला आहे. Industry ला MSEB मार्फत होणारा वीजपुरवठा विशिष्ठ सवलतीच्या दराने केला जातो.  [ads id="ads1"]  

  परंतु, अजूनही पर्यटन उद्योजकांना - हॉटेल/होम स्टे चालकांना मात्र commerical दराने वीजपुरवठा केला जातो. या दोन वीजदरातील फरक मोठा असल्याने, पर्यटन व्यवसायिकांना नाहक प्रचंड मोठा भुर्दंड पडतो आहे. ही बाब सरकार दरबारी पोचविण्यासाठी मा.आमदार ऊमा खापरे आणि दापोलीतील मिहीर महाजन यांनी सुरुवातीला पर्यटन मंत्री मा.मंगलप्रभात लोढा यांची भेट घेतली तसेच हा विषय MSEB कडून मार्गी लागण्याचे आवश्यक असल्याने राज्याचे ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांची भेट देखील घेतली. [ads id="ads2"]  

मा. आमदार ऊमा खापरे आणि मिहीर महाजन यांनी घेतलेल्या भेटी दरम्यान मा.उपमुख्यमंत्र्यांनी ही समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याचे संकेत दिले.यामुळे हॉटेल व्यवसायिकांना इंडस्ट्रीच्या दराने वीजपुरवठा झाल्यास, त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान टळणार असल्याची मिहीर महाजन यांनी आशा व्यक्त केली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️