ग्रामसेवकाला अडीच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडून रंगेहाथ अटक : जळगाव जिल्ह्यातील घटना


धरणगाव तालुक्यातील गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायत ग्रामसेवकाला अडीच हजाराची लाच घेतांना जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे धरणगाव तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. अनिल नारायण गायकवाड, वय-५०, ग्रामसेवक, गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय, ता.धरणगाव जि.जळगाव (वर्ग-३), असे ताब्यात घेतलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. [ads id="ads1"]  

तक्रारदार धरणगाव तालुक्यातील गारखेडा येथील रहीवासी असून त्यांनी गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक अनिल गायकवाड यांच्याकडे ग्रामपंचायती मध्ये सन-२०१५ ते २०२० या कालावधी दरम्यान ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध योजनांच्या कामाचे झालेले लेखापरीक्षण बाबतची माहिती ही माहितीच्या अधिकाराचा अर्ज करून मागितलेली होती. सदरची माहिती ही वेळेत न मिळाल्याने तक्रारदार यांना सदर माहिती देण्याच्या मोबदल्यात गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गायकवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष प्रथम ३ हजार रुपये व तडजोडीअंती अडीच हजार रुपये लाचेची मागणी केली.  [ads id="ads2"]  

  सदर लाच मागणी केलेली रक्कम धरणगाव अमळनेर रोडवरील सिंधु ढाबा येथे पंचासमक्ष स्वतःस्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ग्रामसेवक गायकवाड यांच्यावर धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.

हा सापळा पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाटील, सापळा व तपास अधिकारी पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय एन.एन.जाधव, पो.ना.बाळू मराठे, पो.ना.ईश्वर धनगर, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.कॉ.प्रदीप पोळ,पोकॉ.सचिन चाटे, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी यांनी यशस्वी केला.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️