ऐनपुर महाविद्यालयाचा खेळाडू रोहन भोळे विद्यापीठाच्या क्रिकेट संघात


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाचा एफ.वाय.बी.ए चा विद्यार्थी खेळाडू कु. रोहन रमेश भोळे याची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे.  [ads id="ads1"]  

  सदर आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धा या पंडित दीनदयाल उपाध्याय शेखावाटी विद्यापीठ, सीकर (राजस्थान) येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा संघ रवाना करण्यात आला. त्याची कबचौउमवी संघात निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री भागवत विश्वनाथ पाटील. संस्थेचे सेक्रेटरी श्री.संजय वामन पाटील संस्थेचे चेअरमन श्री.श्रीराम पाटील संस्थेचे उपाध्यक्ष श्री आर.एन महाजन, श्री.आर एस पाटील व सर्व संस्थेचे सर्व संस्थाचालक मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांनी त्याचे अभिनंदन केले. [ads id="ads2"]  

   क्रीडा संचालक डॉ.सचिन एन. झोपे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. स्थानिक क्रीडा समितीचे सदस्य डॉ.के.जी कोल्हे, प्रा.डॉ.आर व्ही.भोळे, डॉ.पी.आर.गवळी, प्रा.एस.आर.इंगळे, श्री.गोपाळ महाजन, प्रा.सौ.रेखा पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खेळाडूचे कौतुक केले व पश्चिम विभागीय क्रिकेट आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️