आदिवासी गर्भवती महिलेची प्रसुतीची जबाबदारी व नवजात बाळाला व मातेला रुग्णवाहिका सेवा न देणाऱ्या डॉ. विजया झोपे यांचेवर तात्काळ निलंबनाची कारवाई करा - बहुजन समाज पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रा.पं.सदस्य प्रदीप सपकाळे यांची निवेदनाद्वारे मागणी

आदिवासी गर्भवती महिलेची प्रसुतीची जबाबदारी व नवजात बाळाला व मातेला रुग्णवाहिका सेवा न देणाऱ्या डॉ. विजया झोपे यांचेवर तात्काळ निलंबनाची कारवाई करा - बहुजन समाज पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रा.पं.सदस्य प्रदीप सपकाळे यांची निवेदनाद्वारे मागणी

रावेर  ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) आदिवासी गर्भवती महिलेची प्रसुतीची जबाबदारी झटकणाऱ्या व नवजात बाळाला व मातेला रुग्णवाहिका व वैद्यकिय सेवा पुरविण्यास असमर्थ असणाऱ्या रावेर तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. विजया झोपे यांचेवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी  प्रदिप भिमराव सपकाळे जिल्हा उपाध्यक्ष बहुजन समाज पार्टी, ग्रामपंचायत सदस्य पेसा ग्रा.पं. कुसुंबे खुर्द यांनी निवेदनाद्वारे केली आहे. [ads id="ads1"]  

  सविस्तर वृत्त असे की,  दि.१७/०१/२०२३ रोजी मौजे कुसुंबे खुर्द, ता. रावेर या ऐसा ग्रामपंचायत अंतर्गत आदिवासी गावात एक आदिवासी गर्भवती महिला  कुरशाद जुम्मा तडवी हिला प्रसुतीच्या वेदना होत असल्याने संबंधीत आशा वर्कर यांनी १०२ या क्रमांकावर रुग्णवाहिका मिळविण्याचा प्रयत्न केला परंतु रुग्णवाहिका वेळेवर न 'आल्याने व गर्भवती महिलेची तब्बेत क्रिटीकल असल्याने १०२ या क्रमांकावर दोन वेळेस रुग्णवाहिका मिळण्यास विनंती केली. मात्र समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने व रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने सदर महिलेची घरीच संध्याकाळी प्रसुती झाली . या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. [ads id="ads2"]  

  गावातील एका खाजगी डॉक्टरांच्या सल्ल्याने  नातेवाईकांच्या व गावकऱ्यांच्या मदतीने रात्रीचे अंधारात थंडीच्या वातावरणात या बाळाला मोटार सायकलवरून रावेर येथील खाजगी रुग्णालयात घेवुन गेलो मात्र तेथील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सदर बाळाला रावेर ग्रामीण रुग्णालय येथे  घेवुन गेलो , मात्र याठिकाणी ही वैद्यकिय अधिकारी नसल्याने तेथील परिचारिकेने  बाळाला शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, जळगाव (Civil Hospital Jalgaon)  येथे घेवुन जाण्याचा सल्ला दिला , मात्र या आदिवासी महिलेच्या या नवजात बाळाला रावेर ग्रामीण रुग्णालय(Raver Rural Hospital) ते जळगांव या प्रवास उपलब्ध होवु शकली नाही या एवढ्या कालावधी मध्ये सुमारे चार तास या नवजात बाळाला व प्रसुती झालेल्या मातेला वैद्यकिय उपचार मिळु शकला नाही अशातच नवजात बाळ रावेर येथे ग्रामीण रुग्णालयात (Raver Rural Hospital) मोटार सायकल वरुन भर थंडीत न्यावे लागले तर त्या मातेला रक्तस्त्राव होत असतांना सुध्दा गाडीची व्यवस्था न झाल्याने ती माता घरी आणि नवजात बालक दवाखान्यात असा मन हेलावणारा प्रसंग या ठिकाणी घडलेला आहे.

त्यामुळे या सर्व प्रकाराची तक्रार करण्यासाठी मदत मिळविण्यासाठी प्रदीप सपकाळे स्वतः एक सामाजिक कार्यकर्ता व ग्रामपंचायत सदस्य या नात्याने रावेर तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. विजया झोपे यांना ध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी सदर प्रकाराबाबत गांभीर्य न दाखविता उडवा उडविची उत्तरे दिली , मी बाहेर असल्याने आपली मदत करु शकत नाही असे स्पष्टपणे सांगितले त्यामुळे  हताश व हतबल होवुन सदर मातेला खाजगी रुग्णवाहिके मधुन सावदा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले व नवजात बाळाला सुध्दा रावेर ग्रामीण रुग्णालया मधुन(Raver Rural Hospital) सावदा येथे ॲपेक्स येथे त्याच्या मातेजवळ त्याला अँडमिट केले व आजपर्यंत या नवजात बालकाचा व या मातेचा हजारो रुपये खर्च करून या खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा :-ग्राम विकास अधिकारी अतुल पाटील याची बनवा बनवी : तक्रारदार करणार सहा फेब्रुवारी पासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

हेही वाचा:- भरधाव कारची बैलगाडीला धडक बैलगाडी चालक जागीच ठार ; रावेर तालुक्यातील वडगाव गावा जवळची दुर्घटना 

 शासन बालमृत्यु मातामृत्यु प्रसुती यावर करोडो रूपये खर्च करते परंतु गरीब आदीवासी जनतेला मात्र याचा काहीच उपयोग होत नाही कारण शासनाच्या योजना व लाभार्थी यामधील दुआ म्हणजेच प्रशासकिय यंत्रणा असते मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता जाणीवपूर्वक गरीब आदिवासी गर्भवती महिलांना सुख सुविधांपासुन व वैद्यकिय उपचारांपासुन वंचित ठेवण्याचे काम आपले वैद्यकिय अधिकारी करीत असल्याचे लक्षात येते.

 कुसुंबे गावामध्ये आरोग्य उपकेंद्र असतांना व जवळच ३ कि.मी. अंतरावर लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असतांना या मातेला घरी प्रसुत व्हावे लागते व तिच्या नवजात बाळाला आणि तिला वैद्यकिय उपचार मिळु शकत नाहीत ही फार मोठी लाजीरवाणी आणि दुखाची गोष्ट आहे. यदाकदाचित या नवजात बालकाचा उपचारा अभावी व रुग्णवाहिके अभावी मृत्यु झाला असता तर? किंवा या प्रसुत झालेल्या मातेचा अतिरक्तस्त्रावामुळे उपचारा अभावी मृत्यु झाला असता तर वेळेवर रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची व वैद्यकिय सुखसुविधा व उपचार उपलब्ध करुन देण्याची तालुका वैद्यकिय अधिकायांची जबाबदारी नाही काय? जर आदिवासी गर्भवती महिला घरीच डॉक्टरांशिवाय प्रसूत होत असेल तर याची जबाबदारी कोणाची ? या मातेचा व नवजात बालकाचा खाजगी रुग्ण वाहिकेचा व खाजगी दवाखान्याचा हजार रूपये खर्च कोण करणार? असे अनेक प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होत आहेत. त्यामुळे आपण जिल्ह्याचे वैद्यकिय अधिकारी असल्याने या सर्वावर नियंत्रण ठेवण्याचे काम आपले असल्याने आपण या घटनेचा गांभीर्यपूर्वक विचार करुन झाल्या प्रकाराची योग्यती चौकशी करुन तालुका वैद्यकिय अधिकारी यांचेवर तात्काळ येत्या आठ दिवसात निलंबनाची कार्यवाही करावी , अन्यथा कोणती ही पुर्वसुचना न देता आपले विरोधामध्ये गावकऱ्यांच्या व नातेवाईकांच्या मदतीने मौजे कुसुंबे, ता. रावेर येथील आरोग्य उपकेंद्राला टाळे ठोकण्यात येईल व तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामास आपण जिल्हा वैद्यकिय अधिकारी या नात्याने स्वतः जबाबदार असाल याची कृपया नोंद घ्यावी, अशा आशयाचे निवेदन बहुजन समाज पार्टीचे उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य प्रदीप सपकाळे यांनी जळगाव जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी , तहसिलदार यांना प्रदीप सपकाळे यांनी दिले आहे.




जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️