नागपूर येथे अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेचा पदग्रहण समारंभ

 

यावल (सुरेश पाटील) - येवला येथील त्रैवार्षिक सभेमध्ये राज्य अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये कार्यकारिणीची नव्याने निवड करण्यात आली सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम शनिवार दि.११फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता पवार विद्यार्थी भवन ( वसतीगृह)१७४ व कुकडे लेआउट,अजनी पोलीस स्टेशन जवळ, रामेश्वरी रोड नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.[ads id="ads1"]  

   यावेळी राज्यस्तरावर,विभाग स्तरावर,जिल्हास्तरावर विविध पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत आणि परिषदेच्या नियमाप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांचा एकत्रितपणे पद ग्रहण व शपथग्रहण समारंभ आयोजित केला आहे.हा पद ग्रहण समारंभ अखिल भारतीय देवांग देवांगन कोष्टी कोष्टा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अरुण वरोडे,पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेचे राज्य अध्यक्ष सतीश राव दाभाडे, नागपूर हे उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाप्रसंगी अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषद समितीचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख कैलास लवंगडे,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. [ads id="ads2"]  

     पदग्रहण समारंभासाठी परिषदेतर्फे ज्या पदाधिकाऱ्यांच्या विविध पदावर नेमणुका करण्यात आलेल्या आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे,या कार्यक्रमाच्या वेळी सर्व पदाधिकाऱ्यांना पद ग्रहण करतेवेळी आपल्या पदाची शपथ,जबाबदारी,कर्तव्य इत्यादी माहिती दिली जाणार आहे,सोबतच सर्वांचा एकत्रित परिचय,परस्पर संवाद सुद्धा करण्यात येणार आहे सदर कार्यक्रम राज्यातील संपूर्ण आजी-माजी पदाधिकाऱ्यांकरिता तसेच समाजातील सर्व कार्यकर्त्या करिता सुद्धा आयोजित करण्यात आला आहे.त्यामुळे राज्यातील सर्वांनीच मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे विनंती वजा आवाहन अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेच्या वतीने उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख कैलास लवंगडे यांनी केले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️