रावेर तालुक्यातील खिर्डी येथील युवकाने टाकाऊ वस्तूंपासून बनविले टिकाऊ सुरक्षा उपकरण

रावेर तालुक्यातील खिर्डी येथील युवकाने टाकाऊ वस्तूंपासून बनविले टिकाऊ सुरक्षा उपकरण

रावेर (समाधान गाढे) रावेर तालुक्यातील खिर्डी खु येथील रहिवाशी राजेश सिध्दार्थ सुरदास यांचे जळगावच्या गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांना लहापणापासून टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचा छंद आहे. त्यांनी सुरक्षा उपकरण तयार केले आहे. [ads id="ads1"]  

त्यांनी आमच्या प्रतिनिधि शी बोलताना सांगितले की,मी शाळेमध्ये असतांना स्काउट गाइड च्या कॅम्प मध्ये असेच वेगळे वेगळे उपकरणे तयार करून सादर केलेले आहेत. एकदा ईमारतीमधून रात्री चोरट्यांनी मोटासायकल चोरला होता. त्यामुळे प्रश्न पडला की भुरट्या चोरांपासून वाचण्यासाठी आपल्याला काही उपाय योजना करता येईल का? त्याचा विचार करत असताना तश्या उपकरणाचा शोध घेत होतो. त्यातून उपकरण आढळले. [ads id="ads2"]   

  परंतु त्याची किंमत जास्त असल्या मुळे त्या उपकरणाचा भ्यास केला व तसेच उपकरण तयार करण्याचा मनात ध्यास बांधला व त्याचे साहित्य आणून उपकरण तयार केले व ते वापरून पाहिले. त्यात यश आले. तसेच या उपकरणात त्यांनी काही टाकाऊ वस्तूंचा वापर केला आहे. 

हेही वाचा : रावेर तालुक्यातील त्या अवैध वृक्षतोड बाबतची चौकशी गुलदस्त्यात का ?

या उपकरणाच्या कक्षेत कोणतीही हालचाल किंवा कोणीही व्यक्ती आला असता हे उपकरण मोठ्याने आवाज करून आपल्याला सावध करते. त्यामुळे भविष्यामध्ये पी.आय. आर मोशन सेन्सर या सुरक्षा उपकरणाचा लोकानी वापर केल्यास निश्चितच चोऱ्यांना आळा बसेल असे मत त्यांनी "सुवर्ण दिप न्यूज" शी बोलताना व्यक्त केला.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️