जळगाव जिल्ह्यात "या" ठिकाणी बिबट्याचा अपघाती मृत्यू : बिबट्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 जळगाव जिल्ह्यात "या" ठिकाणी बिबट्याचा अपघाती मृत्यू : बिबट्यावरशासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 चाळीसगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याचा शनिवारी अखेर मृत्यू झाला. बिलाखेड (Bilakhed Taluka Chalisgaon) येथील वनात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यातील पिलखेड शिवारात अज्ञात वाहनाने बिबट्याने उडवल्याने तो जखमी झाला होता. [ads id="ads1"]  

झुंज ठरली अखेर अपयशी

चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड शिवारातील चाळीसगा -मालेगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना 27 जानेवारीला रात्री 8:30 वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव वनपरीरक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे ह्या आपल्या सहकार्‍यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमी बिबट्याला औषधोपचारासाठी जेरबंद करण्याचा प्रयत्न केला मात्र जखमी बिबट्याने कर्मचार्‍यांवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. यात वनविभागाची सहा तास शर्यत सुरू होती. परंतु त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले व शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास शेतकर्‍याच्या मक्याच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळला. बिबट्याच्या मृतदेहाचे बिलाखेड येथील राखीव वनात शवविच्छेदन करून शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. [ads id="ads2"]  

जळगाव उपवनसंरक्षक विवेक होशिंग, सहा.वनसंरक्षक सुदर्शन शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे चाळीसगाव, मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई, राजेश ठोंबरे, जी.एस.पिंजारी, आर.व्ही.चौरे, जाधव, एस.बी.चव्हाण, वाय.के.देशमुख, के.बी.पवार, आर.आर.पाटील, आर. बी.पवार, सी.व्ही.पाटील, एम.पी.शिंदे, एस.एच.जाधव, ए.एन.महिरे, अमित पाटील, एस.एच.जाधव, बाळू शितोळे, भटू अहिरे, श्रीराम राजपूत, दिनेश कुळकर्णी, राहुल मांडोळे, समाधान मराठे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड व पोलीस कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत बिबट्यावर शासकीय इतमामात बिलाखेड राखीव वनात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️