🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
▪️ नाशिक पदवीधर निवडणुकीतील BJP चा सस्पेन्स कायम: बावनकुळे म्हणाले - भाजपने ठरवले तर शेवटच्या 24 तासांतही निर्णय घेतला जाईल
▪️ राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार: विनायक राऊतांचा दावा; म्हणाले - राणे माझ्या विरोधात अडीच लाख मतांनी पराभूत होतील
▪️ आमदार संतोष बांगर यांच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल: प्राचार्यांना मारहाण केल्याचे प्रकरण, घटनेच्या 10 दिवसांनंतर पोलिसांत तक्रार [ads id="ads1"]
▪️ देशात मोदी सरकारच्या विरोधात जनमत: सी व्होटरच्या सर्व्हेवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले - विरोधकांच्या एकजुटीचे प्रयत्न सुरू
▪️ जाऊ द्या... आता तो प्रश्न कशाला!: पहाटेच्या शपथविधीवर अखेर शरद पवार यांचे भाष्य; म्हणाले - आता पुरे त्या घटनेला 2 वर्षे लोटली
▪️ राष्ट्रपती भवनाच्या मुघल उद्यानाचे नामकरण: आता अमृत उद्यान म्हणून ओळखले जाणार; 31 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुले होणार
▪️ 'सुखोई-मिराज'ची हवेत टक्कर, 1 वैमानिक ठार: ग्वाल्हेरवरून उड्डाण, मुरैनात धडकले; मिराज तिथेच, तर सुखोई 90KM दूर भरतपूरला कोसळले
[ads id="ads2"]
▪️ सनातन हाच देशाचा राष्ट्रीय धर्म: उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचे विधान; दुसऱ्या धर्मांसाठी जागा आहे का? काँग्रेसचा सवाल
▪️ अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने एलआयसीचा तोटा: एलआयसीचे 2 दिवसात 18,646 कोटींचे नुकसान; शेअर्समध्ये 81,268 कोटींची होती गुंतवणूक
▪️ क्रिकेटमधील व्यस्त वेळापत्रकाबद्दल डिव्हिलियर्स म्हणाला: आता तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळाडूंना खेळणे अशक्य, त्यांच्यासाठी ही जणू शिक्षाच
▪️ बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चा डंका: तीन दिवसांत वर्ल्डवाइड 300 कोटींहून अधिकची कमाई, वीकेंडपर्यंत 500 कोटींचा टप्पा ओलांडणार
📣 राष्ट्रपती भवनाच्या मुघल उद्यानाचे नामकरण - आता अमृत उद्यान म्हणून ओळखले जाणार आहे तसेच 31 जानेवारीपासून हे उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले होणार.
📣 30 जानेवारी रोजी राज्यात पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदानाच्या दिवशी मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत.
📣 भारत-पाकिस्तान यांच्यातील सिंधू जल वाटप कराराबाबत मोठी बातमी, सिंधू जल करारात सुधारणा प्रकरणी भारताची पाकिस्तानला नोटीस
📣 जावई सासऱ्याच्या संपत्तीत किंवा घरात हक्क सांगू शकत नाही - असा निकाल उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल कुमार यांनी दिला.
📣 दक्षिण अफ्रिका पुढील दशकभरात 100 आफ्रिकन चित्ते भारतात पाठवणार आहेत.
📣 शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी काही जाचक अटी यापूर्वी होत्या, मात्र आता बळीराजाची या जाचक अटीतून मुक्तता होणार आहे.