सदर ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम 2022 (Grampanchayat Election Programme 2022) अंतर्गत प्रत्यक्ष निवडणुक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये मतदानाच्या दिवशी निवडणुक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये मतदान शांततेत पार पाडाव्यात तसेच त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सोबत जोडलेल्या यादीत नमुद केलेल्या ठिकाणी ग्रामपंचायत हद्दीतील मदयविक्री दुकाने बंद ठेवणे आवश्यक आहे.[ads id="ads2"]
जिल्हाधिकारी जळगाव (Jalgaon Collector) यांचे पत्र क्र. साशा/ग्रामप/ईकावी/12/21/503/2022 दिनांक 5 डिसेंबर, 2022 रोजीच्या पत्रा नुसार ऑक्टोंबर 2022 ते डिसेंबर,2022 या कालावधीत जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतीच्या कालावधीत मुदत संपणाऱ्या असल्याने तेथे 18 डिसेंबर रोजी निवडणूका पार पडणार आहेत.
👉हेही वाचा:- Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
👉हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर
👉हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
👉हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
👉हेही वाचा : Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
महाराष्ट्र विदेशी मदय (रोखीने विक्री व नोंदवहया इ) चे नियम 1969 चे नियम 9(अ) (2) (C) (1), (2) तसेच महाराष्ट्र देशी मदय नियम 1973 चे नियम 26 (C) (1), (2), तसेच महाराष्ट्र ताडी दुकाने ( ताडी झाडे छेदणे) 1968 चे नियम 5 (अे) (1), (2) टी.डी,1 अनुज्ञप्तीतील अ.क्र.11 (a) अन्वये मदय विक्री दुकाने असलेल्या निर्वाचन क्षेत्रात ज्या दिवशी स्थानिक प्राधीकरणाच्या सार्वत्रीक निवडणुका किंवा पोटनिवडणुका होत असलेल्या ठिकाणी मतदानाचा दिवस मतदानाच्या अगोदरचा दिवस व मतमोजणीचा दिवशी मदय विक्री बंद ठेवण्याबाबत नमुद केलेले आहे.
तरी जळगांव जिल्हयातील (Jalgaon District) 140 ग्रामपंचायती निवडणूक मतदानाच्या दिवशी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये मदयविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जळगांव जिल्हाधिकारी(Jalgaon Collector) यांनी दिले आहे. असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.