महाड रायगड येथे विश्व वंजारी साहित्य परिषदेचा सन्मान...


रविवार दि.२५ डिसेंबर २०२२ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे कोकण प्रदेश रायगड विभाग महाड तालुका वतीने राजमाता जिजाऊ साहित्य संमेलन भरवण्यात आले होते.  [ads id="ads1"]  

यावेळी विश्व वंजारी साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर वंजारी परिषदेचे कार्याध्यक्ष हंगेवाडीचे सुपुत्र साहित्यिक मा.डाॅ.अनिल सांगळे प्रमुख पाहुणे म्हणून विराजमान होते.यांनी हा सन्मान स्वीकारला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने साहित्यिक बांधव उपस्थित होते.या कार्यक्रमास वंजारी परिषदेच्या अध्यक्षा सौ.सुरेखाताई शिरसाठ, आणि सरचिटणीस श्री.रमेश केदार, मा.प्रकाश शिरसाठ यांनाही शुभेच्छा दिल्या.  [ads id="ads2"]  

यावेळी आमचे मार्गदर्शक अभिनेते व चित्रपट निर्माते साहित्यिक उद्घाटक अ.भा.सा.प. राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री.शरद गोरे सर यांनाही वि.वं.सा.प. वतीने सन्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रीय उपाध्यक्षा मा.शुभांगी ताई काळभोर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास पदाधिकारी मा.डॉ.अ.ना.रसनकुटे मा. डॉ.अलकाताई नाईक मा.सायली पिंपळे,मा.श्रद्धा पाटील,आणि सर्व साहित्यिक व रसिक मंडळी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होती. सर्व महाड आयोजक टीम आणि अध्यक्ष प्रा. सुरेश मेहता यांनी सर्वोत्तम नियोजनबद्ध राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचा कार्यक्रम यशस्वी केला.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️