गटशिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे यांच्या शुभहस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन !....
धरणगांव प्रतिनिधी - पी.डी. पाटील सर
धरणगांव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे आजपासून ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जन्मदिनाच्या औचित्य साधून क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.[ads id="ads1"]
क्रीडा महोत्सवाचे प्रास्ताविक एस एन कोळी यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी रवीकरण बिऱ्हाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख रमेश महाजन, दिलीप बाविस्कर, ज्ञानेश्वर माळी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले व हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.[ads id="ads2"]
शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. शाळेचे माजी विद्यार्थी तथा केंद्रप्रमुख रमेश महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगितले. आज खेळाडूंना आयपीएल मध्ये लाखो - करोडोची बोली लागते. खेळ मैदानावर खेळल्याने आपले शरीर तंदुरुस्त राहते. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी व्हॉलीबॉल ची सर्विस करून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केले. बिऱ्हाडे साहेबांनी खेळाचे महत्व विशद केले. खेळामुळे खेळाडूवृत्ती निर्माण होते. मनुष्य सकारात्मक विचार करतो. मॅच हारणे व जिंकणे स्वीकारतो व सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सवाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी दिवसभर क्रीडा महोत्सवाचा आनंद घेतला. क्रीडा महोत्सवाचे सूत्रसंचालन व आभार एस एन कोळी यांनी केले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक बंधु - भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.