"भारतोलन स्पर्धेत" रावेर तालुक्यातील गाते येथील अमोल सुरवाडे यांना सुवर्ण पदक

 


रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा ) रावेर तालुक्यातील गाते येथील रहिवाशी अमोल विनोद सुरवाडे, भारत महाविद्यालय जालना येथे शिकत असलेला बि.पि.एड या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहे.तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व अजिंठा शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भारतोलन,शक्तीतोलन,व शरीर सौष्ठव स्पर्धेचे आंतर महाविद्यालयीन क्रिडा महोत्सव २०२२-२३ चे आयोजन दिनांक १९-१२-२०२२ रोजी करण्यात आले होते. [ads id="ads1"]  

  तसेच १०९+ वजनी गटातील खेळाडू म्हणून अमोल विनोद सुरवाडे याची महाविद्यालयातर्फे निवड करण्यात आली होती.तसेच भारतोलन स्पर्धेत तब्बल २१० किलो वजन उचलून प्रथम क्रमांकाने यश संपादन करून त्याने सुवर्णपदक पटकविले. [ads id="ads2"]  

उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाचे डायरेक्टर श्री.महेश राजे निंबाळकर यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र व सुवर्ण पदक देवून गौरविण्यात आले आहे.तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिपसाठी मोहाली येथे निवड करण्यात आलेली आहे. अमोल सुरवाडे याला मार्गदर्शक म्हणून संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे क्रिडा प्रमुख निलेश गाडेकर सर, टिम कोच अलाउद्दीन तडवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.तसेच सर्व शिक्षक वृंद व सहकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️