कोरोनामध्ये शाळा सुरू असताना कला, क्रीडा संगणक शिक्षकांनी सेवा दिली, परंतु शासनाने या शिक्षकांवर दूर्लक्ष करत सेवेत सतत खंड पाडला, शाळेतील व शाळेबाहेरील कामे या शिक्षकांकडून करवून घेतली परंतु पगार कधी वेळेवर दिला नाही, आताही 6 ते 7 महिन्यापासूनचा पगार हा विभागाला निधी नसल्याच्या कारणाने भेटलेला नाही तरीही इमाण इतबारे सेवा देणाऱ्या या शिक्षकांना बह्योस्रोताद्वारे भरती करून सेवा घेण्याचा घाट शासनाने घातलेला आहे. [ads id="ads2"]
तरी सर्व महाराष्ट्रातील कला क्रीडा संगणक शिक्षक हे शासनाकडे सेवासातत्य ची मागणी करत असून ,बाहयस्रोत ही आधुनिक गुलामगिरी आहे तरी विद्यार्थी शिक्षणात सरकारी , कंत्राटी , मानधन, तासिका ,रोजंदारी असे प्रकार करून शासन कर्मचाऱ्यांत तफावत निर्माण करत असून याचा दूरगामी, दुष्परिणाम विद्यार्थी शिक्षणावर होणार असून आदिवासी विकास विभागातील विद्यार्थी हे ग्रामीण, तसेच पेसा क्षेत्रातील आहे,त्यामुळे हे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे, तरी पुढील दिवसांत होणाऱ्या आदिवासी विकास विभागातील भरती प्रक्रियेत बह्योस्रोत/कंत्राटी न भरता कला , क्रीडा संगणक शिक्षकांचे समायोजन करावे व मागील अनुभव लक्षात घेऊन उत्तम विद्यार्थी घडवण्यासाठी या शिक्षकांना संधी मिळावी हीच मागणी कला क्रीडा संगणक शिक्षकांद्वारे करण्यात आली आहे.