ऐनपूर येथे पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन


ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल 

 ऐनपुर येथे महाराष्ट्राचे लोकनेते माजी कृषी मंत्री आदरणीय शरद पवार साहेब यांच्या व अँड रोहिणीताई खडसे यांच्या वाढ दिवसा निमीत्त पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे स्थळ सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपुर ता रावेर दिंनाक 25/12/2022 रविवार वेळ 10,00 वाजता . या शिबिरास जळगाव येथील दर्जी फाऊंडेशनचे संस्थापक प्रा . गोपाल दर्जी सर याचे मार्गदर्शन लाभणार आहे.[ads id="ads1"] 

 तरी या शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राध्यापक गोपाल दर्जी सराचे 590 रु चे पोलीस भरती व सरळ सेवा परीक्षा ठोकळा पुस्तक आयोजकांकडून मोफत देण्यात येणार आहे तरी या शिबिराचा लाभ सर्व अकरावी पासुनच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.[ads id="ads2"] 

  या कार्यक्रमाचे आयोजक श्री दिपक संतोषराव पाटील ( पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस ) व किशोर भगवान पाटील (ग्राम पंचायत सदस्य ऐनपूर तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाखा प्रमुख तसेच विद्यार्थ्यांना नाव नोंदणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ऐनपुर शाखा अध्यक्ष मोहन ईश्वर कचरे मो .नंबर 9545050516 व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तालुका सरचिटणीस अरविंद रविंद्र महाजन मो.नं. 8657848840 यांच्याशी संपर्क साधावा व परीसरातील विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.

हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील 'या' 140 ठिकाणी 18 व 20 डिसेंबर रोजी मद्यविक्रीला बंदी ; जिल्हा प्रशासनाचा आदेश 

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️