अमळनेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) जळगाव जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्यांचे सत्यशोधक स्मारक बनविण्यासाठी सत्यशोधक समाज संघ कटिबद्ध आहे असे प्रतिपादन अरविंद खैरनार ( सत्यशोधक समाज संघाचे राज्याध्यक्ष ) यांनी केले. अमळनेर येथे रविवार दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी सत्यशोधक समाज संघाचे प्रचारक तथा निवृत्त प्राध्यापक विश्वासराव पाटील यांच्या निवासस्थानी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हास्तरीय दुसऱ्या अधिवेशनाच्या प्रचारासाठी विशेष बैठक घेण्यात आली. [ads id="ads1"]
बैठकीत जळगाव जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळीत योगदान देणाऱ्या गावांची व कार्यकर्त्यांच्या नावांची ऐतिहासिक कार्यकर्तृत्वासह माहिती सत्यशोधक अरविंद खैरनार यांनी देऊन सत्यशोधक समाज संघाची व्यापक भूमिका मांडली.जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळीत योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सत्यशोधकांचे स्मारक लोकवर्गणीतून किंवा शासनाकडे मागणी करून स्मारक बनविण्याचा निर्धार व्यक्त केला.त्यावेळी डांगरी गावाचे मान्यवर अनिल भाऊ शिसोदे बैठकीला उपस्थित होते.डांगरी गावातून जास्तीत जास्त नागरिकांना पानाचे कुऱ्हा अधिवेशनास घेऊन येण्याचा दृढनिश्चय केला.[ads id="ads2"]
बैठकीत शिवाजी नाना पाटील यांनीअभंग व अखंड पुढील निर्भंगावलीचे लेखन त्यामागील प्रेरणा व आनंदाभुतीचे विवेचन केले.निर्भंगावलीच्या माध्यमातून आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचे कसे सृजनशील प्रबोधन करता येईल याबद्दलही सखोल मार्गदर्शन केले.निर्भंगावली ग्रंथ शिवाजी पाटील यांनी सत्यशोधक विधीकर्ते भगवान रोकडे यांना सन्मानपूर्वक भेट दिला. डांगरी गावातील सत्यशोधक उत्तमराव पाटील व सुकन्या लीलाताई पाटील यांच्या कार्यकर्तृत्वा संदर्भात विद्या वाचस्पती झालेले संशोधन कर्ते सुप्रसिद्ध प्राध्यापक विलासराव पाटील यांनीही चर्चेत सहभाग नोंदविला. संशोधन कार्यात आलेल्या अडचणींबद्दल त्यांनी स्वानुभव सांगितले. अधिवेशनास बहुसंख्य कार्यकर्त्यांसह हजेरी नोंदवू असेही त्यांनी कबूल केले. चर्चा प्रसंगी विश्वासराव पाटील,अधिवेशन जिल्हा आयोजन समिती सदस्य कार्यकर्ते विजय लुल्हे सर ,सत्यशोधक विधीकर्ते भगवान रोकडे व विधीकर्ते शिवदास महाजन यांनीही चर्चेत सहभाग घेतला.अमळनेर शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत जगदाळे व प्रा.डॉ.सुभाष महाजन या कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी जाऊन गाठीभेटी घेत समयोचित चर्चा विनिमय करण्यात आली.सूत्रसंचालन व ऋणनिर्देश विजय लुल्हे यांनी केले.