विश्व वंजारी साहित्य परिषद आयोजित मुंबई येथे १ ले "वंजारी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न


मुंबई (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रविवार दि.११.डिसेंबर.२०२२ रोजी आर्य समाज मंदिर वर्सोवां अधेरी पश्चिम मुंबई येथे पार पडलेल्या विश्व वंजारी साहित्य परिषद आयोजित पहिले वंजारी साहित्य संमेलन अतिशय नियोजनबद्ध आणि उत्साहात पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पुजन करून व तुलसी वृक्षास जल अर्पण करून निसर्ग संवर्धनाचा संदेश देऊन दिप प्रज्वलनसह समेलनास प्रारंभ करण्यात आला. [ads id="ads1"] 

संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक मा.श्री.नागनाथ पाटलोबा बडे होते.डाॅ.शितलताई चोले/ नागरे,यांनी आपले वडील ज्येष्ठ साहित्यिक व संचालक स्व.रावसाहेब चोले, यांच्या विषयी आठवणी सांगितल्या व त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ परिचय पत्राचे अनावरण करून ते त्यांच्या परिवाराच्या शुभहस्ते "विश्व वंजारी साहित्य परिषद" करीता राष्ट्रीय सल्लागार डॉ.अलकाताई नाईक यानी स्विकारले.[ads id="ads2"] 

यावेळी शितलताई यांनी प्रभावीपणे आपले सामाजिक कार्य विषयी मत व्यक्त केले. अनाथाश्रम वृद्धाश्रम यासाठी सर्वांनी मदत करावी असे मत आपल्या भाषणातून व्यक्त केले. डाॅ.अलकाताई नाईक,यांनी आपल्या भाषणात साहित्य, संस्कृती, संगोपन,सामाजिक कार्य, अवयव दान, प्रभावीपणे साहित्य निर्मिती कशी करावी, तसेच त्या सायकॉलॉजिस्ट विषय माहिती व स्री जीवनावरचा पोवाडा मंजुळ आवाजात गाऊन, समाज प्रबोधनही केले. समाज उपयोगी कार्य हाती घेतले पाहिजे, संस्थेला संस्था जोड झाली पाहिजे सन्मान केला पाहिजे,असे पखरपणे विचार व्यक्त केले. निसर्ग संवर्धन पर आणि साहित्याची जोड असे नयनाकर्षक सन्मानचिन्ह बघून डॉ. नाईक यांनी सर्वांच्या मेहनतीचे कौतुक केले. 

 संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कविवर्य श्री.नागनाथ पाटलोबा बडे हे शिक्षण खात्यात नौकरीस असताना आलेले अनुभव कथन केले. मला त्या काळी ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब चोले यांचे खूप अनमोल मार्गदर्शन लाभले, आणि आज त्यांच्या कन्या, शितलताई चोले/नागरे, यांच्यासोबत बसण्याचे ही भाग्य लाभले, व्यासपीठावर बसण्यासाठी कार्याध्यक्ष डॉ. अनिल सांगळे यांनी अगदी योग्य माणसांची निवड केली आहे असेही बडे आपल्या भाषणात म्हणाले.साहित्य व साहित्य कसे लिहावे कोणत्या पद्धतीने मांडणी असावी यासाठी वांग्मय साहित्याचे प्रथम आभ्यासपुर्ण वाचन हा सर्वात महत्त्वाचा पाया आहे,आणि प्रभावी वाचनानेच सर्वोत्तम लेखक घडतो,असे मत संमेलनाध्यक्ष बडे यांनी व्यक्त केले. 

सूत्रसंचालन कवयित्री सौ. मंगलताई कांगणे यांनी केले. तसेच सहकारी प्रकाश शिरसाठ व प्रसाद गीते यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बहूमोलाचे सहकार्य केले. परिषदेच्या अध्यक्षा सौ.सुरेखा प्रकाश शिरसाठ, राष्ट्रीय सरचिटणीस श्री.रमेश केदार, राष्ट्रीय कार्यध्यक्ष मा.डॉ.अनिल सांगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्व साहित्य प्रेमी मान्यवर रसिक या सर्वांचे आभार व्यक्त केले, व शुभेच्छा दिल्या. सर्व साहित्यिकांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष, सर्वांचे सहकार्य लाभले. 

मा. रतनहरी बडे,मा. सानिका खेडकर,मा. शारदा खेडकर,मा. कविता बिरारी,मा. अलका सानप,मा. रजनी निकाळजे,मा. क्षितिज शिरसाठ,मा. केतन तेरेकर,मा. गोरक्षनाथ फड,मा. रुपाली फड,मा. विमल सोनवणे,मा. संजय सोनवणे, मा. मीना उगलमुगले,मा. शांताराम महाराज घुगे,मा.राक्षे सर (पुणे) ,मा. बबनभाऊ शिवेकर,सौ.लीला अनिल सांगळे,सृष्टी सांगळे,ऋग्वेद फड,पद्मश्री सांगळे तसेच मदतीने सहकार्याने महाराष्ट्रभरातून "विश्व वंजारी साहित्य परिषद" वतीने घेण्यात आलेल्या पहिल्या वंजारी साहित्य संमेलनास साहित्यिक व इ.मान्यवरानी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. या अविस्मरणीय आणि सुंदर अशा कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात आला.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️