अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी तीन जणांविरोधात विरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी तीन जणांविरोधात विरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल


सावदा (सुवर्ण दिप वृत्तसेवा) मुलगी अल्पवयीन आहे असे माहित असतानाही तिचा विवाह केल्याप्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात (Savda Police Station) पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षी विनोद बावस्कर, विनोद मोहन बावस्कर आणि अशोक दिलीप पाटील (सर्व रा. दसनूर ता. रावेर जि. जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. ठाणे जिल्ह्यातील कुळगाव (Kulgaon) येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने पोलिसात फिर्याद दिली आहे. [ads id="ads1"]  

फिर्यादीत म्हटले आहे की, 6 नोव्हेंबर 2022 रोजी मला नवरी बनवून दुपारच्या 3 वाजेच्या सुमारास अशोक दिलीप पाटील (रा. लहान वाघोदा ता. रावेर जि. जळगाव) यांच्या सोबत जबरदस्तीने लग्न लावले. त्यानंतर 7 नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर २०२२ रोजी पावतो अशोक पाटील यांनी कोणतीही जबरदस्ती केली नाही.  [ads id="ads2"]  

 परंतू मी वयाने लहान आहे, हे माहित असतांना सुद्धा अशोक पाटील यांनी माझ्या सोबत साक्षी विनोद बावस्कर, विनोद मोहन बावस्कर ( रा. दसनूर ता. रावेर जि.जळगाव ) अशोक पाटील यांनी व इतर नातेवाईकांनी लावण्यास मदत केली, अशी फिर्याद कुळगाव, ठाणे ग्रामीण येथे शून्य क्रमांकाने फिर्याद नोंदवून सावदा पोलिस स्टेशन ला वर्ग केली. 

हेही वाचा : मोफत रेशन 'या' महिन्यापर्यंत मोफत मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय 

यामध्ये या प्रकरणी सावदा पो.स्टे. ला (Savda Police Station) बाल विवाह प्रतिबंधक कायद्या कलम 9,10,11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स. पो. नी. जालिंदर पळे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ विजय पोहेकर हे करीत आहेत.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️