मोफत रेशन 'या' महिन्यापर्यंत मोफत मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय


👨🏻‍🌾 राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पुढील एका वर्षासाठी मोफत रेशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने नवीन वर्षापूर्वीच नागरिकांना मोठी भेट दिली आहे. यामुळे आता लोकांना डिसेंबर 2023 पर्यंत मोफत रेशन मिळणार आहे. [ads id="ads1"]  

🧐 केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय:

▪️ कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने देशव्यापी लॉकडाऊनमुळे गरिबांना खाण्यासाठी मदत म्हणून एप्रिल 2020 मध्ये PMGKAY योजना लाँच करण्यात आली. या योजनेअंतर्गत 80 कोटी गरीब लोकांना दरमहा मोफत रेशन दिले जात होते.[ads id="ads2"]  

▪️ राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या या मोफत रेशनच्या योजनेची मुदत चालू वर्षी 31 डिसेंबर 2022 रोजी संपत होती. आता त्याला केंद्र सरकारने एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पुढच्या डिसेंबरअखेर ही मोफत अन्नधान्याची योजना सुरू राहील. 

▪️ बीपीएल कार्ड असलेल्या कुटुंबांना दर महिन्याला मोफत रेशन दिले जाते. या मुदतवाढीमुळे पुन्हा 80 कोटी नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. तर केंद्र सरकारवर 2 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजादेखील पडणार आहे. 

👉हेही वाचा:- Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज 

👉हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

👉हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

👉हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

👉हेही वाचा : Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

📍 मंत्री पियुष गोयल यांनी माहीती दिली की, "राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत आता 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळणार आहे. डिसेंबर 2023 पर्यंत लोकांना अन्नधान्य मिळवण्यासाठी 1 रुपयाही द्यावा लागणार नाही. कारण सरकार आणखी एक वर्ष सुमारे 2 लाख कोटी रुपये खर्च करेल", असं ते म्हणाले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️