रावेर तालुक्यातील चिनावलचा अग्रिवीर चेतन वानखेडे याने नवस फेडण्यासाठी तब्बल ४७ कि.मी.धावून शिरसाळा येथील मारुतीचे घेतले दर्शन





रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील चिनावल येथील भारतीय सेनेत आपला समावेश होण्यासाठी  नुकतीच शिरसाळा मारूती ला नवस बोललेला व अग्निवीर साठी निवड झालेला रावेर तालुक्यातील चिनावल येथील चेतन रमेश वानखेडे या तरुणाने नवस फेडण्यासाठी चक्क चिनावल ते शिरसाळा मारोती हे ४७ कि.मी. चे आंतर सलग ६ तास धावत जाऊन मारोती रायाचे दर्शन घेत आपला नवस पूर्ण केला. [ads id="ads1"]  

  घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या चिनावलचा तरुण चेतन वानखेडे हा भारतीय सैन्य दलात भरती साठी दररोज सराव करीत होता एकदोन वेळा प्रयत्न केल्यावर त्याने शिरसाळा ता.बोदवड येथील मारूती रायाला : साकडे घालत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या अग्निवीरसाठी पहिल्याच यादीत चेतनचा नबंर लागला आहे. [ads id="ads2"]  

   नंबर लागताच चेतनला बोललेल्या नवसची फेड करायची होती. ती  दि . २१ रोजी चिनावल येथून धावत जाऊन ६ तासात ४७ किलोमीटर आंतर कापत मारूती चरणी लिन झाला.

हेही वाचा : मोफत रेशन 'या' महिन्यापर्यंत मोफत मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय 

 श्रद्धा हाच खरा विश्वास चेतनने सार्थ करीत दररोजच्या सराव व कठीण परिश्रमाने भारतीय सैन्य दलात स्थान मिळवल्याने त्याचे चिनावल व परिसरात कौतुक होत आहे . नवस फेडण्यासाठी मित्र परिवाराने त्याला प्रोत्साहन दिले .

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️