जीनियस मास्टर फाउंडेशन जामनेर यांचे वतीने जि. प. शेळगांव शाळेस संगणक भेट


 विशेष प्रतिनीधी फिरोज तडवी

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील जीनियस मास्टर फाउंडेशन यांचे वतीने, जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री.किरण शिंदे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री सरोदे साहेब, केंद्रप्रमुख श्री विकास वराडे सर यांच्या हस्ते व फाउंडेशनचे अध्यक्ष श्री रमेश पाटील सर, कोषाध्यक्ष श्री नामदेव पाटोळे सर, प्रसिद्धीप्रमुख श्री श्रीकांत पाटील सर व जनार्दन लोखंडे सर यांच्या उपस्थितीत जिनियस मास्टर फाउंडेशन च्या वतीने शेळगाव जी.प. मराठी शाळेत संगणक भेट दिला. [ads id="ads1"] 

   तसेच या कार्यक्रमा प्रसंगी जामनेर पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक किरण शिंदे साहेबांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना बहुमुल्य असे मार्गदर्शन केले .या प्रसंगी गावातील सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य ,पोलीस पाटील व गावातील गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. शिक्षकवृंद श्री गंगाधर बारी, श्री युवराज सुरडकर,श्री किरण पाटील, श्रीम. प्रतिभा सुतार, सौ.भारती पाटील व सर्व ग्रामस्थांनी जीनियस मास्टर फाउंडेशन करीत असलेल्या कामाचं कौतुक केलं व त्यांचे आभार मानले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️