रावेर शहरात वीज चोरी करणार्‍या 22 जणांविरुध्द महावितरणची धडक कारवाई

 

रावेर शहरात वीज चोरी करणार्‍या 22 जणांविरुध्द महावितरणची धडक कारवाई

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : वीज चोरट्यांविरोधात महावितरणने (Mahavitaran) धडक मोहिम राबवण्यास सुरूवात केली असून रावेर शहरात (Raver City) वीज चोरी करणार्‍या 22 जणांविरुध्द कारवाई करण्यात आल्याने वीज चोरट्यांमध्ये खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"] 

रावेर शहरातील (Raver City) राजीव पाटील नगर, रोकडा हनुमान नगर, विश्वकर्मा नगर आणि शिक्षक कॉलनी परीसरात उप कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांचा मार्गदर्शनाखाली वीज चोरट्यांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. [ads id="ads2"] 

  यामध्ये रावेर शहरातील विविध भागांमध्ये 22 लोकांवर कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी सहा.अभियंता दिलीप सुंदराणी, समीर तडवी,गणेश दहीभात, श्रीकृष्ण बर्कुल, मुकेश ठाकरे, संतोष जाधव व इथर कर्मचारी सतीश चौधरी, भिका साळुंखे, चंद्रकांत ठाकूर, चेतन भरते, अरुण माळी, कल्पेश पाटील, महेश चौधरी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील 'या' 140 ठिकाणी 18 व 20 डिसेंबर रोजी मद्यविक्रीला बंदी ; जिल्हा प्रशासनाचा आदेश 

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️