महाराष्ट्र सरकारकडून नागरिकांना दिवाळी भेट ; "बोलठाण घाट माथ्यावरील नागरिक वंचित" असे वृत्त प्रसिद्ध होताच आज बोलठाण येथे दिवाळी भेट आनंदाचा शिधा वाटप


नाशिक (मुक्ताराम बागुल) जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावरील नागरिकांना महाराष्ट्र सरकारकडून दिली जाणारी दिवाळीची भेट किराणा किट आनंदाचा शिधा मिळण्यापासून वंचित राहिले होते. सदरची वृत्त प्रसिद्ध होताच आज दिनांक एक नोव्हेंबर 2022 रोजी मंगळवारी बोलठाण येथे विविध सहकारी सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकान यांच्यामार्फत बोलठाण ग्रामपंचायतचे उपसरपंच अंजुमताई पठाण ग्रामपंचायत सदस्य मनोज रिंढे, ग्रामसेवक भगवान जाधव यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आला.[ads id="ads1"] 

       याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब जनतेसाठी दिवाळीचा आनंद करण्याची हेतूने महाराष्ट्र शासनाची तर्फे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी दिवाळी भेट शंभर रुपयांमध्ये किराणा किट आनंदाचा शिधा वाटप करण्याचे जाहीर केले होते.[ads id="ads2"] 

 ‌ त्याप्रमाणे महाराष्ट्रासह नांदगाव तालुक्यात दिवाळीपूर्वी हा आनंदाचा शिधा किराणा किट गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचला परंतु नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे हा आनंदाचा गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचलाच नाही याबाबत फक्त प्रसिद्ध झाल्यानंतर आज दिनांक एक नोव्हेंबर 2022 रोजी मंगळवारी बोलठाण येथील स्वस्त धान्य दुकान दार यांना पुरवठा विभागाने आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिल्याने बोलठाण ग्रामपंचायत उपसरपंच अंजुमताई पठाण, ग्रामपंचायत सदस्य मनोज भाऊ रिंढे, ग्रामसेवक भगवान जाधव, बोलठाण विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन भालचंद्र भास्कर खुटे हे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर 

     नांदगाव तालुक्याचे पत्रकार मुक्ताराम बागुल यांनी आनंदाचा शिधा वाटपा संदर्भात वृत्त दिल्याने व गोरगरिबांना न्याय मिळवून देऊन अन्याय विरोधात आवाज उठवत असल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️