विरावलीत विविध समस्या ; ग्रा.प.सदस्य ॲड देवकांत पाटील यांनी दिले निवेदन


यावल (सुरेश पाटील)

विरावली गावात मोठ्या प्रमाणात विविध समस्या निर्माण झाल्या असून ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांनी तात्काळ उपाययोजना करावी म्हणून यावल राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा विरावली ग्रा.प.सदस्य ॲड. देवकांत पाटील यांनी निवेदन दिले.[ads id="ads1"] 

     विरावली ग्रामपंचायत सरपंच सचिव यांच्याकडे दिलेल्या निवेदनात ॲड देवकांत पाटील यांनी म्हटले आहे की विरावली गावात अनेक मोठ्या प्रमाणात समस्यांनी थैमान घातले असून वेळो-वेळी मासिक मीटिंगमध्ये तोंडी- लेखी सूचना देऊनही सरपंच,सचिव याकडे दुर्लक्ष करत असून वार्ड क्रमांक तीन मधील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहेत गटारांची अवस्था अत्यंत खराब- दयनीय झाली असून नवीन गटार बांधकाम करावे विरावली गावातील मेन रस्त्याचा गटारीवरील ढापा पाच ते सहा महिन्यापासून तुटलेला असून वाहने जे-जा करतांना अपघात झाल्यास शारीरिक - आर्थिक,जिवीत हानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे,[ads id="ads2"] 

  शिवाय रस्त्याने चालताना त्या गटारीच्या ढाप्यावरून लहान मुल म्हातारे माणसे यांचे पाय गटारीच्या अस्वच्छ,दुर्गंधी,पाण्याने खराब होत आहे.वाहने त्या (ढाप्यावर) गटारीमध्ये आपटली जातात त्यात वाहने खराब होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही त्याचप्रमाणे गावातील सार्वजनिक पाण्याचे कुंड खराब अवस्थेत असून त्याच्या आजू बाजूला देखील मोठ्या प्रमाणात चिखल होऊन घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे त्याची दुरुस्ती करून तेथे उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.त्याच प्रमाणे पंधरा वित्त आयोग निधीतून खालचे गाव पेव्हर ब्लॉक बसवणे त्याच प्रमाणे गावात जाणारा मुख्य रस्ता त्याचे कॉंक्रिटीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे कारण पावसाळ्यात चिखल झाल्यामुळे या मुख्य रस्त्यावरून चालणे अवघड होऊन जाते लहान मूल म्हातारी माणसे यांना पायी चालणे शक्य होत नाही वाहन चालवताना देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे यापूर्वीही ग्रामपंचायतला सरपंच सचिव यांना निवेदन दिले आहे. तरी या मुख्य रस्त्यावर कॉंक्रिटीकरण प्राधान्य क्रमाने करणे आवश्यक आहे वार्ड क्रमांक 2 मध्ये सार्वजनिक मुतारीची मागणी मासिक मीटिंगमध्ये अनेक वेळा केली गेली त्याकडेही दुर्लक्ष होत आहे.वार्ड क्रमांक एक मधील शेजारी असणाऱ्या नाल्यात सांडपाणी साचले जात असून त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे तरी त्या सांड पाण्याचे नियोजन करून नाल्याचे खोलीकरण करणे,गाळ काढणे आवश्यक आहे अशा अनेक महत्त्वाच्या या मागण्या असून त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अन्यथा विरावली गावातील नागरिक व आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आंदोलन करणार याची नोंद घेऊन तात्काळ वरील समस्या सोडविण्यात याव्या अशी मागणी यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा विरावली ग्रा.प.सदस्य देवकांत पाटील यांनी केली.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️