कळवण तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धाेत शासकीय आश्रमशाळा खर्डेदिगर येथील मुले व मुली यांचे दोन्ही कबड्डी संघ विजयी

कळवण - आज दि 17/11/2022 रोजी ता. कळवण या ठिकाणी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा कबड्डी गट 14 च्या संपन्न झाल्या. त्यामध्ये शासकीय आश्रमशाळा खर्डेदिगर येथील मुले व मुली यांचे दोन्ही कबड्डी संघ हे विजयी झाले आहे तरी मुलांचे व मुलींच्या संघाचे सामने हे अत्यंत चुरशीचे झाले, अंतिम सामना आर. के. एम. विद्यालय कळवण आणि आश्रमशाळा खर्डेदिगर यांच्यात झाला त्यात विकी देशमुख या रायडरने बोनस गुणासह संघाला आघाडी मिळवून दिली व रमेश गांगुर्डे व पोपट ठाकरे यांनी उत्तम पकड ठेवत अत्यंत अटीतटीच्या सामन्यात संघाला विजय मिळवून दिला. [ads id="ads2"]  

  मुलींचा अंतिम सामना निसर्ग विद्यालय कळवण आणि आश्रमशाळा खर्डेदिगर यांच्यात झाला त्यामध्येही खर्डेदिगर संघाने उत्तम खेळाचे प्रदर्शन करत विजय संपादन केला. प्रकल्प अधिकारी कळवण तसेच खर्डेदिगर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक , सर्व शिक्षकवृंद कर्मचारी, खर्डेदिगर गावाचे सरपंच यांनी दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन केले आहे व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे.



जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️