यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
यावल तालुक्यातील विरावली गावात मोठ्या प्रमाणात समस्या भेडसावत असुन वेळो - वेळी मासिक मीटिंगमध्ये तोंडी- लेखी सूचना देऊनही सरपंच ,सचिव याकडे दुर्लक्ष करत असून वार्ड क्रमांक तीन मधील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत असून गटारांची अवस्था अत्यंत - दयनीय झाली असून नवीन गटार बांधकाम करावे. [ads id="ads1"]
विरावली गावातील मेन रस्त्याचा गटारीवरील धापा पाच ते सहा महिन्यापासून तुटलेला असून वाहने जे - जा करतांना अपघात झाल्यास शारीरिक - आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे , शिवाय रस्त्याने चालताना त्या गटारीच्या धाप्यावरून लहान मुल म्हातारे माणसे यांचे पाय गटारीच्या अस्वच्छ, दुर्गंधी , पाण्याने खराब होत आहे. वाहने त्या (ध्याप्यावर ) गटारीमध्ये आपटली जातात त्या वाहन खराब होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही त्याचप्रमाणे गावातील सार्वजनिक पाण्याचे कुंड खराब अवस्थेत असून त्याच्या आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणात चिखल होऊन घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे.[ads id="ads2"]
त्याची दुरुस्ती करून तेथे उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे , त्याचप्रमाणे पंधरा वित्त आयोग निधीतून खालचे गाव फ्लेवर ब्लॉक बसवणे त्याचप्रमाणे गावात जाणारा मुख्य रस्ता त्याचे कॉंक्रिटीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे कारण पावसाळ्यात चिखल झाल्यामुळे या मुख्य रस्त्यावरून चालणे अवघड होऊन जाते लहान मूल म्हातारी माणसे यांना पायी चालणे शक्य होत नाही वाहन चालवताना देखील तारेवरची कसरत करावी लागते यापूर्वीही ग्रामपंचायतला सरपंच सचिव यांना निवेदन दिले आहे तरी या मुख्य रस्त्यावर कॉंक्रिटीकरण प्राधान्य क्रमाने करणे आवश्यक आहे वार्ड क्रमांक 2 मध्ये सार्वजनिक मुतारी ची मागणी मासिक मीटिंगमध्ये अनेक वेळा केली गेली त्या कडेही दुर्लक्ष होत आहे. वार्ड क्रमांक एक मधील शेजारी असणाऱ्या नाल्यात सांडपाणी साचले जात असून त्यातून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे तरी त्या सांड पाण्याचे सुनियोजन करून नाल्याचे खोलीकरण करणे गाळ काढणे आवश्यक आहे अशा अनेक महत्त्वाच्या या मागण्या असून त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अन्यथा विरावली गावातील नागरिक व आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही तरी आपण आमच्या निवेदनाची लवकरात लवकर दखल घेऊन वरील सर्व मागण्या मान्य कराल ही अपेक्षा व मागणी यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अध्यक्ष तथा विरावली ग्रा प सदस्य ॲड देवकांत बाजीराव पाटील यांनी सरपंच सचिव ग्रामपंचायत विरावली यांच्याकडे केली आहे.