जळगाव (फिरोज तडवी)
जळगांव जिल्हयातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलिस स्टेशन हद्दीतील सावखेडा येथील एका जणाच्या शेतात गांजाचे झाडे लावले आहे अशी गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महेंद्र वाघमारे यांना कळली असता त्यांनी लगेच आपले वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक श्री एम राजकुमार व डी वाय एस पी श्री भारतजी काकडे साहेब यांना दिली व लागलीच आपले पोलीस कर्मचारी यांना सोबत घेऊन टाकली व मुद्देमालासह आरोपीस जेरब़दं केले.[ads id="ads1"]
पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांना मिळाल. पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांनी सुभाष पाटील यांच्या शेतात धाड टाकुन सुमारे २०० गांज्याच्या झाडांची लागवड केली असल्याचे मिळून आले. तसेच घटनास्थळावरुन सुमारे ४६ लाख ४८ हजार रूपये किंमतीचा किलो गांजा जप्त करण्यात आला. तसेच आरोपी सुभाष पाटील यांचेविरुद्ध एन. डी. पी. एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. [ads id="ads2"]
आरोपी सुभाष पाटील यास अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक महेंद्र वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलिस हवालदार रणजित पाटील, पोलिस नाईक अरुण राजपूत, शिवनारायण देशमुख, सचिन वाघ, पोलिस शिरस्तेदार संदीप राजपूत, अभिजित निकम, दिपक सोनावणे, प्रमोद वाडीले, अमोल पाटील, उज्वल जाधव, विकास पवार या पथकाने केली.