रावेर येथे राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेला सुरुवात ; राज्यातून ३५२ खेळाडूंनी नोंदविला सहभाग


 रावेर तालुका प्रतिनीधी (विनोद हरी कोळी) महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धांना उत्साहात सुरुवात झाली. २५, २६ आणि २७ नोव्हेंबरला २२ जिल्ह्यातून आलेले सुमारे ३५२ महिला पुरुष खेळाडू १० प्रकारच्या विविध वजन गटात आपले कौशल्य दाखवणार आहेत.[ads id="ads1"] 

       रावेर येथील सरदार जी.जी.हायस्कूलच्या अग्रवाल रंगमंचावर या स्पर्धा होत आहेत. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार डॉ उल्हास पाटील होते. डॉ कुंदन फेगडे, धनंजय चौधरी, रावेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन डॉ दत्तप्रसाद दलाल, प्राचार्य डॉ पी व्ही दलाल, पद्माकर महाजन, डॉ भगवान कुबटे, अशोक वाणी, शीतल वाणी, विकास देशमुख कन्हैयालाल अग्रवाल, विजय लोहार, डॉ नेमाडे, पोलीस निरीक्षक कैलास नागरे तसेच राज्य वेटलिफ्टिंग असोसिएशनचे श्री चोळकर, संतोष सिंहासने, बिहारीलाल दुबे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रवी शर्मा व्यासपीठावर उपस्थित होते.[ads id="ads2"] 

           जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश मुजुमदार, प्रशिक्षक योगेश महाजन, राजेश शिंदे, यशवंत महाजन, आमोद महाजन, युवराज माळी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रकाश बेलस्कर यांनी प्रास्ताविक केले. योगेश महाजन यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रकाश मुजुमदार बिहारीलाल दुबे, डॉ भगवान कुबटे, धनंजय चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️