सावदा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह उपनिरीक्षक जळगाव एसीबीच्या जाळ्यात

  रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद कोळी)  सावदा, ता. रावेर पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक डी. डी. इंगोले व उपनिरीक्षक गायकवाड यांना एका प्रकरणातील लाच मागणी चांगलीच महागात पडली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता जळगाव एसीबीच्या (Jalgaon ACB) पथकाने लाच मागणी प्रकरणी दोघांना अटक केल्याने जिल्हा पोलिस (Jalgaon Police)  दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.[ads id="ads2"] 

तडजोडीअंती मागितली 15 हजारांची लाच

 सूत्रांच्या माहितीनुसार, एका प्रकरणात इंगोले यांच्यावतीने उपनिरीक्षक गायकवाड यांनी तक्रारदाराकडे 60 हजारांची लाच सुमारे दिड ते दोन महिन्यांपूर्वी मागितली होती व 15 हजार रुपयात तडजोड झाल्यानंतर लाच स्वीकारण्याचे ठरले होते.

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर 

हेही वाचा :- कुशीनगर एक्स्प्रेसच्या दरवाजात उभे असलेल्या बर्‍हाणपूरच्या युवकाचा रेल्वे मधून खाली पडल्याने मृत्यू ; सावदा रेल्वे स्थानकाजवळील घटना

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

 मात्र ट्रॅपचा संशय आल्याने संबंधितांनी लाच स्वीकारली नसलीतरी लाच मागणी सिद्ध झाल्याने जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पथकाने मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दोघांना ताब्यात घेतल्याने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️