दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी च्या महाराष्ट्रातील ठळक घडामोडी

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

📣  एलन मस्ककडून युझर्सना मोठा दिलासा - Blue Tick सबस्क्रिप्शनसाठी निर्णय रद्द करण्यात आला असून , Blue Tick फक्त आता iOS यूजर्ससाठी जारी करण्यात आली आहे. 


📣  मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने(MMRTA) शहरातील विमानतळाच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय टर्मिनलवरून टॅक्सी आणि ऑटोच्या भाड्यात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. 


📣  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेड, यवतमाळ, महाराष्ट्र या बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्यामुळे परवाना रद्द केला आहे.

[ads id="ads1"] 

📣 तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच शिंदे गटाला धक्का बसला आहे. शिंदे गटाच्या ठाण्यातील माजी नगरसेविका रागिणी भास्कर वेरीशेट्टी यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. 


📣 महाराष्ट्र शासनाचा नवा निर्णय ! - महिलांसाठी महाराष्ट्र पोलिसांनी मोफत राइड योजना सुरू केली आहे , या योजनेअंतर्गत महिला (1091 किंवा 7837018555) या पोलीस हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून वाहन मागू शकतात.


📣 वेदांता फॉक्सकॉन नंतर आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर ४०० कोटींचा ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प आता मध्यप्रदेश मध्ये होणार 


▪️नलिनी श्रीहरणची 31 वर्षांनी सुटका: राजीव गांधींच्या हत्येप्रकरणी होती तुरुंगात; सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तुरुंगाबाहेर

[ads id="ads2"] 

▪️राजस्थानमध्ये CM बदलाचे संकेत: आचार्य प्रमोद म्हणाले- हायकमांड लवकरच मोठा निर्णय घेणार; आमदारांचीही मिळेल साथ


▪️आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर: 'ऊर्जा उपकरण निर्मिती झोन'मध्ये मध्य प्रदेश सरकारने मारली बाजी; पुन्हा कलगीतुरा रंगणार!


▪️प्रकल्प 3-4 महिन्यांत जात नसतो: 'ऊर्जा उपकरण निर्मिती झोन'वर CM शिंदेंचे स्पष्टीकरण, म्हणाले- प्रकल्प म्हणजे जादूची कांडी नाही


▪️जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर: विवियाना मॉलमधील मारहाणप्रकरणी ठाणे कोर्टाकडून 12 जणांना दिलासा


▪️जेलमधून बाहेर येताच आव्हाडांचा इशारा: फाशी झाली तरी चालेल, पण शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण होऊ देणार नाही


▪️जादूटोण्याचे वक्तव्य अंगलट: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची पोलिस ठाण्यात तक्रार


▪️फडणवीसांची शेलकी टीका: म्हणाले - एखाद्या गोष्टीचा कांगावा करणं ही आव्हाडांची स्टाइल; तमाशा करून मारहाण केल्याने कारवाई


▪️शिंदे गटातही नाराजीचे वारे: आमदार सुहास कांदेंची पालकमंत्री दादा भुसेंविरोधात तक्रार, एकाही बैठकीला बोलवत नाहीत


▪️ट्विटरने ब्लू टिक सबस्क्रिप्शनवर घातली बंदी: वेगाने वाढणाऱ्या बनावट खात्यामुळे 8 डॉलरची सबस्क्रिप्शन सेवा बंद करावी लागली

हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

▪️शाहरुख खानला मुंबई विमानतळावर रोखले: शारजाहहून आणल्या होत्या 18 लाखांच्या घड्याळी, 7 लाखांचा भरावा लागला दंड


▪️ग्रेगर बार्कले पुन्हा ICC च्या अध्यक्षपदी: सलग दुसऱ्यांदा निवडून आले, 2024 पर्यंत राहतील या पदावर


▪️विराट-सूर्या प्लेअर ऑफ द टूर्नामेंटच्या शर्यतीत: बटलरसह इंग्लंडचे 3 खेळाडू, तर पाकिस्तानच्या 2 खेळाडूंचाही समावेश


▪️अभिनेत्री बिपाशा बसूला कन्यारत्न: मुलीचे नाव ठेवले 'देवी बसू सिंग ग्रोव्हर', सोशल मीडियावर शेअर केली बाळाची पहिली झलक

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️