SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज


 SC GD 2022 : सरकारी नोकरीच्या (Govt Job) शोधात असणाऱ्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कर्मचारी निवड आयोगानं (SSC) नुकतीच विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. SSC मध्ये बंपर भरती करण्यात येणार आहे. या भरतीअंतर्गत 24 हजारहून अधिक रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. [ads id="ads1"] 

  या भरती अंतर्गत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो परीक्षेत सेंट्रल पॅरा मिलिटरी फोर्सेस (CAPF), SSF आणि आसाम रायफल्स आणि शिपाई रायफलमन (GD) पदासाठी अर्ज मागवले आहेत. एसएससी जीडी भरती मोहिमेअंतर्गत केंद्रीय निमलष्करी दल (CAPF), SSF आणि आसाम रायफल्समध्ये कॉन्स्टेबलची भरती करण्यात येणार आहे.[ads id="ads2"] 

भरतीसाठी इच्छुक उमेदवार ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत 24 हजार 369 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे.

👉 हेही वाचा :-  पोलीस भरतीला स्थगिती..! नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलली ; तरुणांच्या पदरी पुन्हा निराशाच

रिक्त पदांचा तपशील (SSC GD Constable 2022)

कर्मचारी निवड आयोगानं (SSC) जीडी कॉन्स्टेबल भरतीमध्ये विविध पदासाठी अर्ज मागवले असून या भरतीमध्ये 24 हजार 369 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

SSC GD भरती - रिक्त जागांचा तपशील

बीएसएफ (BSF) : 10497

सीआईएसएफ (CISF) : 100

सीआरपीएफ (CRPF) : 8911

एसएसबी (SSB) : 1284

आईटीबीपी (ITBP) : 1613

एआर (AR) : 1697

एसएसएफ (SSF) :103

SSC GD भरतीसाठी 2022 अर्जाची फी

एसएससी जीडी भरती 2022 साठी अर्जाचे शुल्क 100 रुपये आहे. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) आरक्षणासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

SSC GD भरती 2022 पात्रता

या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी परीक्षा पास

SSC GD भरती 2022 वयोमर्यादा

या भरतीअंतर्गत रिक्त पदांसाठी अर्ज करणारे उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2023 रोजी 18-23 वर्षे या वयोमर्यादे दरम्यान असावे.

SSC GD भर्ती 2022 साठी अर्ज कसा करावा?

ssc.nic.in या वेबसाइटवर जा.

मुख्यपृष्ठ उघडल्यानंतर स्वतःची नोंदणी करा

तुम्ही तयार केलेल्या युजर आयडी आणि पासवर्डने लॉग इन करा

अॅप्लाय ऑनलाईन (Apply Online) या पर्यायावर क्लिक करा

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️