चाळीसगाव प्रतिनिधी - प्रमोद पाटील सर
चाळीसगाव - चाळीसगाव तालुक्यातील मांदुर्णे येथे जगाचा पोशिंदा - शेतकऱ्यांचा राजा - महात्मा बळीराजा यांना अभिवादन करण्यात आले.[ads id="ads1"]
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच दगडू गणपत पाटील होते. सरपंच व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभहस्ते लोककल्याणकारी महात्मा बळीराजा, कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय, शिक्षण क्रांतीचे जनक - सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले, भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.[ads id="ads2"]
कार्यक्रमाचे अध्यक्ष गावाचे सरपंच दगडू पाटील यांनी महात्मा बळीराजाचे कल्याणकारी, सुख - समाधानाचे राज्य यासंदर्भात गावकऱ्यांना माहिती सांगितली. बळीराजाच्या काळात शेतकरी हा सुखी होता आणि पुन्हा एकदा बळीराजाचे राज्य यावे !.... ही अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.
👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी
👉 हेही वाचा :- दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत
याप्रसंगी गावातील ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, कैलास कदम, आनंदा पाटील, गोरख पाटील, शिवाजी महाजन, लक्ष्मण पाटील, अन्वर मन्सुरी, धोंडू भिल, ईश्वर भिल, लहू महाजन, धर्मराज पाटील, दगडू आत्माराम पाटील, दिनेश पाटील, संतोष पाटील, दगडू उत्तम पाटील, रंगराव पाटील, भिकन पाटील, समीर मन्सुरी, दीपक तुपे, हरूण मन्सुरी, वासुदेव पाटील, पोपट पाटील, विकास पाटील, निलेश पाटील व गावातील जेष्ठ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रमोद पाटील व आभार विकास पाटील यांनी मानले.