फेमस इन्स्टाग्राम रिल्स बनवणाऱ्या एस टी महामंडळच्या महिला कंडक्टर निलंबित

 


लातुर । सुशिल कुवर

फेमस टिक टॉक स्टार व इन्स्टाग्राम रिल्स आणि एसटी महामंडळात लेडी कंडक्टर असलेल्या महिलेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत या लेडी कंडक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने महिला कंडक्टरला मोठा धक्का बसला आहे.

    

धाराशिव जिल्ह्यातील मंगल सागर गिरी या लेडी कंडक्टरला ऑन ड्यूटी असता स्वतःचे इन्स्टाग्रामवर रील व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणे चांगलंच महागात पडल आहे. मंगल सागर गिरी या धाराशिव जिल्ह्यातील कळंब आगारामध्ये लेडी कंडक्टर म्हणून नोकरीस आहेत. त्या वेगवेगळ्या गाण्यावर रील व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. त्यांच्या या व्हिडिओंना सोशल मीडियावर खुप लाईक्स आणि कमेंट मिळत असतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलॉवर्स देखील आहेत.[ads id="ads1"] 

दरम्यान एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावरचा मंगल गिरी यांनी एक व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केला होता. हा त्यांचा व्हिडिओ तुफान गाजला होता. [ads id="ads2"] 

मंगल गिरी यांच्या या व्हिडिओवर एसटी महामंडळाने आक्षेप घेतला आहे. तसेच अशा व्हिडिओमूळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत त्यांनी मंगल गिरी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच मंगल गिरी यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकार्यालाही निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईने मंगल गिरी यांना मोठा धक्का बसला आहे. 

हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)

 रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन 

दरम्यान व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या एसटी महामंडळाच्या या निर्णयाविरोधात संताप देखील व्यक्त होतोय.  

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️