माननीय बच्चुभाऊ कडू या संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात गोरगरीब ,शेतकरी, विधवा, अपंग ,वृद्ध व निराधार जनतेसाठी ,आंदोलन उभारून त्यांना न्याय मिळवून दिला .माझी माननीय बच्चुभाऊ कडू हे अचलपूर, विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून सलग चार वेळा निवडून आलेले आहेत. [ads id="ads2"]
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात त्यांचा नैतिक दबदबा आहे .त्यांनी राज्याचे मंत्रिपद ,भूषविलेले आहे. असे असताना आमदार रवी राणा यांनी माननीय, बच्चुभाऊ कडू .यांची राजकीय व सामाजिक पतप्रतिष्ठा मलिन करण्याच्या हेतूने बडनेरा मतदारसंघात सार्वजनिक कार्यक्रम ठिकाणी बच्चू भाऊ कडू .यांनी गुवाहाटी येथे जाऊन 50 खोके घेतले असा जाहीर आरोप केला. व त्यासंबंधीच्या बातम्या रावेरसह महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध झाल्या. यामुळे प्रहार दिव्यांग संघाची प्रतिमा मलिन झालेली आहे.
हेही वाचा :- सावद्यात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी ; जमावाने दुचाकीसह चारचाकींची केली तोडफोड ; सावदा पोलिसात संशयितांवर गुन्हा दाखल
तरी सदर प्रकरणी आमदार रवी राणा, यांच्यावर ठोस गुन्हा दाखल होऊन कार्यवाही व्हावी, या येथूने प्रहार दिव्यांग संघटना रावेर तालुका अध्यक्ष, विनोद कोळी. यांनी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पीएसआय सुशील नवले साहेब .यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल केला .पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन देतेवेळी शशिकांत पाटील, प्रहार दिव्यांग उपाध्यक्ष मोहसीन खान, दिव्यांग तालुका शहराध्यक्ष शेख मोहसीन ,दिव्यांग रावेर संपर्कप्रमुख विश्वनाथ भिल्ल, दिव्यांग तालुका संघटक. इत्यादी प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.