दिवाळीच्या दिवशीच विजेच्या धक्क्याने दोन वायरमनचा मृत्यू ; जळगाव जिल्ह्यातील घटना

दिवाळीच्या दिवशीच विजेच्या धक्क्याने दोन वायरमनचा मृत्यू ; जळगाव जिल्ह्यातील घटना

जामनेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : भारतात सर्वत्र दीपावलीचा आनंदोत्सव सुरु असतांना काळाने घाला घालत दीपावलीच्या दिवशीच विजेचा धक्का लागून वीज वितरणच्या (Maha Vitran) दोन वायरमनचा (Wireman) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जामनेर तालुक्यात असलेल्या फत्तेपूर (Fattepur Taluka Jamner) येथे सोमवारी सकाळी १० वाजता ही दुर्दैवी घटना घडली. [ads id="ads1"] 

  गणेश प्रकाश नेमाडे (४५, रा. कन्हाळा ता. भुसावळ) आणि सुनील भरतसिंग चव्हाण (४०, रा. टाकळी पिंप्री ता. जामनेर) अशी मृत वायरमनची नावे आहेत. गणेश हे वायरमन (Wireman) म्हणून महावितरण मध्ये होते तर सुनील हे झिरो वायरमन(Zero Wireman) होते. कापसाच्या शेतात खांबावरील पडलेले तार उचलायला गेले. आणि. फत्तेपूर येथील पेट्रोल पंपासमोरील (Fattepur Petrol Pumps) कापसाच्या शेतात खांबावरील तार खाली पडल्याचा निरोप मिळाल्याने गणेश आणि सुनील हे तिथे पोहोचले. [ads id="ads2"] 

  पडलेल्या या तारेला हात लावताच गणेश यांना शॉक(Shock) लागला आणि ते जागीच ठार झाले. तर दवाखान्यात नेत असतानाच सुनील यांचा रस्त्यात मृत्यू झाला. पाणावले. गणेश यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. 

👉 हेही वाचा :- Jalgaon : मुक्ताईनगर तालुक्यात १७ लाखांच्या गुटख्यासह वाहन जप्त ; विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाची कारवाई 

👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी 

👉 हेही वाचा :-   दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत

गणेश व सुनील चव्हाण यांचे मृतदेह जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात (Jamner Civil Hospital) आणण्यात आल्यानंतर त्यांच्या परिवारातील सदस्यानी मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan)यांनी सकाळी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाइकांची भेट घेतली आणि शासनाकडून मृतांच्या वारसांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️