चाळीसगाव प्रतिनिधी - प्रमोद पाटील सर
चाळीसगाव तालुक्यातील मांदुर्णे येथील प्रगतिशील शेतकरी वसंतराव नारायण पाटील यांची नात व कै.विनायक वसंतराव पाटील (PWD अभियंता नंदुरबार)यांची मुलगी तसेच मांदुर्णे येथील वायरमन विकास वसंतराव पाटील यांची पुतणी कु.मानसी विनायक पाटील हिच्या उत्कृष्ट गोलकीपिंगच्या कामगिरीमुळे सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र टीम राष्ट्रीय चॅम्पियन झाली.[ads id="ads1"]
पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय रोल बॉल फेडरेशन कप २०२२ स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्र टीमने छत्तीसगड, झारखंड, उत्तरप्रदेश, तमिळनाडू या सर्व संघावर वर विजय मिळवून राजस्थान विरूद्ध अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या सर्व महिला खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली यामध्ये कु.मानसी विनायक पाटील हिच्या उत्कृष्ट गोलकीपिंगच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राने ७ - १ असा स्कोर मिळवून सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र संघ राष्ट्रीय चॅम्पियन झाला.[ads id="ads2"]
राष्ट्रीय चॅम्पियन कु.मानसीचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.राष्ट्रीय पातळीवर आपल्या खेळाचा ठसा उमटविणाऱ्या मानसीला आता आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीप खुणावत आहे.मानसी आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळविणार याबद्दल सगळ्यांनी खात्री व्यक्त केली असून तिच्या उज्वल भविष्यासाठी सर्व मांदुर्णे वासीयांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
चाळीसगांव तालुक्यातील मानसीचे मूळ गाव असलेल्या मांदुर्णे गावातील सरपंच सुनंदाबाई दगडू पाटील व दगडू गणपत पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने मानसीचे अभिनंदन करण्यात आले. मानसीने मांदुर्णे गावाचं नाव राष्ट्रीय पातळीवर नेले याचा सार्थ अभिमान असल्याचे पाटील यांनी सांगितले.