दिवाळी अंकाचे प्रकाशन ; ग्रामगौरव नवा आयाम ठरावा


जामनेर,जि.जळगाव :  गावखेड्यांच्या समृद्धिसाठी राज्यभर लक्षवेधी काम करणाऱ्या ग्रामपंचायती,व्यक्ती,अधिकारी आणि स्वयंसेवी संस्था यांची दखल घेत इतरांनी प्रेरणा घ्यावी म्हणून ग्रामगौरव प्रकाशन काम करीत असल्याचा आनंद आहे. ग्रामगौरवने दिवाळी अंकात सुद्धा गावाच्या सकारात्मक बाबी हेरून मांडणी केली असल्याने निश्चित याचा ग्रामविकासात फायदा होईल,अशा भावना व्यक्त करून मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांनी ग्रामगौरव प्रकाशन एक नवा आयाम ठरावा अशा अपेक्षा व्यक्त केल्या.[ads id="ads1"] 

ग्रामविकास,वैद्यकीय शिक्षण आणि युवक,कल्याण-क्रीडा मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते ग्रामगौरवच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनचा छोटेखानी कार्यक्रम दिवाळी पाडवा आणि भाऊबीजचे निमित्त साधून २६ ऑक्टोबर रोजी जामनेर (जि.जळगाव) येथील त्यांच्या निवासस्थानी संपन्न झाला.[ads id="ads2"] 

प्रारंभी प्रकाशनाच्या राज्यातील सर्वात कमी वयाच्या युवती संपादिका कु.धनश्री ठाकरे यांनी मंत्री महाजन यांचे ग्रामगौरव प्रकाशनाच्या वतीने स्वागत व सत्कार केला.समूह संपादक विवेक ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती.वाणिज्य संपादक आनंद बागुल यांनी दिवाळी अंकाच्या विषयांची मांडणी करून 'ग्रामगौरव'च्या राज्यभरात सुरू असलेल्या वाटचालीचा आढावा थोडक्यात मांडला.

वाचकांना अंक झाला उपलब्ध 

पुण्यातून प्रसिद्ध होणाऱ्या ग्रामगौरव मासिक प्रकाशनाचा पहिलाच दिवाळी अंक ग्रामविकास मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांच्या हस्ते प्रकाशित झाल्यानंतर आता अंक मात्र दोनशे रुपये किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध असून वाचकांना थेट पत्त्यावर स्पीड पोस्ट किंवा ऑनलाईन कुरियर सर्व्हिसेस द्वारा पाठवला जाईल.अंकाच्या बुकिंग आणि अधिक माहितीसाठी वितरण युनिट हेड सौ.स्नेहा लिंबेकर - पोतदार यांच्याशी कार्यालयात 02035001382 या दूरध्वनीवर किंवा जनसंपर्क अधिकारी सौ.धनश्री पाचंगे यांच्याशी 8446240151 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️