रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर येथील पंचायत समिती कार्यालयातील (Raver Panchayat Samiti)कार्यरत असलेले पशुधन पर्यवेक्षक व रावेर एसटी आगारातील वाहकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याच्या दोन दुःखद घटना घडल्या.[ads id="ads1"]
रावेर येथील पंचायत समिती कार्यालयातील (Raver Panchayat Samiti Office) कार्यात असलेले पशुधन पर्यवेक्षक डॉ. सुकलाल मन्नू राठोड (वय ५२, मूळ देउळगाव, ता. जामनेर जि.जळगाव) यांच्याकडे रावेर तालुक्यातील अटवाडे येथील पशुधन पर्यवेक्षक पदाचा अतिरिक्त पदभार होता. [ads id="ads2"]
रात्रंदिवस ते गुरांवरील लम्पी चर्मरोगाच्या साथरोगात औषधोपचारासाठी खानापूर परिसरात झालेल्या धावपळीत त्यांचा अचानक रक्तदाब कमी होऊन औषधोपचार सुरू असताना जळगाव येथे शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- रावेर पंचायत समितीतील शौचालय गैरव्यवहार प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
दुसरीकडे औरंगाबाद येथे शुक्रवारी औषधोपचारासाठी गेलेले रावेर आगारातील (Raver Aagar) एसटी वाहक दिलीप कडू सुतार (५७, ह. मु. सौभाग्य नगर, रावेर, रा. मारूळ, ता. यावल जि.जळगाव) जळगाव येथील बहिणीकडे मुक्कामी राहून शनिवारी एसटीने प्रवास करून पत्नी व दोन्ही मुलींसह रावेरला येत असताना भुसावळ बसस्थानकात दुपारी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली.या दोन्ही घटनेने संपूर्ण रावेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.