नाशिक पदवीधर निवडणूक वंचित बहुजन आघाडी लढवणार - रतन बनसोडे

नाशिक पदवीधर निवडणूक वंचित बहुजन आघाडी लढवणार - रतन बनसोडे

अहमदनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  - नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूक लढविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी अहमदनगर बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. या पदवीधर निवडणूक मतदार संघाचे मतदार नोंदणी बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश कार्यालयीन सचिव मा.रतन बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील माजी शिक्षण विस्तार अधिकारी पक्षाचे सल्लागार जीवन पारढे,योगेंद्र गायकवाड,प्रमोद आढाव करण्यात आली.[ads id="ads1"] 

   वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात ही मतदार नाव नोंदणी सुरू राहणार आहे तसे सर्व पदाधिकारी यांना सूचना देण्यात आले आहेत.नाशिक पदवीधर मतदार संघ उमेदवार बाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे अधिकृत घोषणा लवकरच करतील असे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांनी सांगितले.[ads id="ads2"] 

यावेळी प्रदेश कार्यालयीन सचिव रतन बनसोडे यांचे स्वागत नगर शहर अध्यक्ष संजय जगताप,शहर जिल्हा उपाध्यक्ष अजिमभाई शेख,प्रवीण ओरे,अमर निर्भवणे,गणेश राऊत,अजिमभाई शेख,विशाल साबळे,अमोल काळपुंद,शुभम भिंगारदिवे,इम्रान इनामदार,असिफ भाई शेख यांनी केले तसेच कार्यकर्तेसह उपस्थित होते. 

पदवीधर मतदार संघ निवडणूक-कुणी मतदान करायच? याबाबत प्रदेश कार्यालयीन सचिव रतन बनसोडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,या निवडणुकीसाठी मतदान करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करावी लागते.प्रत्येक निवडणुकीच्या वेळी नवीन नोंदणी असते आणि बॅलट म्हणजे मतपत्रिकेवर शिक्का मारूनच मतदान होतं. त्यामुळे मतदारसंघात हजर राहून मतदान करणं आवश्यक आहे.सामान्य नागरिक म्हणून आपली जशी कर्तव्ये आणि अधिकार असतात तसेच अधिकार पदवीधर म्हणूनही असतात.ग्रॅज्युएट झाल्यावर घटनेने आपल्याला आपला प्रतिनिधी निवडायची संधी दिली असते. हा आपण निवडलेला प्रतिनिधी आपल्या समस्या सभागृहात मांडतो आणि त्याचा पाठपुरावा करतो. जर तो तसे करत नसेल तर त्याला जाब विचारण्याचा अधिकारही आपल्याला आहे. आपण अपेक्षेप्रमाणे कामे झाली नाही तर आमदाराला जाब विचारतोच ना? मग निवडून गेलेला पदवीधर प्रतिनिधी नेमकं काय करतोय हे ही जाणून घ्यायला हवंच की पदवीधर मतदार नोंदणीकरिता पात्रता तो भारताचा नागरीक असावा.तो मतदार नोंदणीकरिता अर्हता दिनांकाच्या किमान ३ वर्षापूर्वी, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किंवा तत्सम विद्यापिठाचा पदवीधर असावा. सर्वसाधारणपणे संबंधित मतदारसंघातील रहिवासी असावा

त्याने विहित कागदपत्रांसह फॉर्म क्र. १८ भरावा. पदविका(Diploma) जर पदवीतूल्य असेल तरच पदवीधर गृहित धरण्यात येईल.पदवीधर मतदार नोंदणीकरिता आवश्यक इतर कागदपत्रे रहिवासाचा पुरावा.(पासपोर्ट,वाहन अनुज्ञप्ती,टेलीफोन/विज बिल किंवा इतर मान्यताप्राप्त कागदपत्रांची साक्षांकित प्रत.)मार्क लिस्टची साक्षांकित प्रत.पदवी/पदविकेची साक्षांकित प्रत.विवाहित महिलेने विवाहानंतर नाव बदलले असल्यास त्याबाबतचे राजपत्र,पॅन कार्ड,राजपत्र नसल्यास प्रतिज्ञापत्र.प्रमाणपत्रांचे साक्षांकन संबंधित जिल्ह्यात कार्यरत तहसीलदार किंवा गट विकास अधिकारी किंवा शासन मान्यता प्राप्त विद्यालयाचे प्राचार्य किंवा जिल्ह्यातील अन्य राजपत्रित अधिकाऱ्यांकडून करून घ्यावे.

    अशी माहिती वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी दिली.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️